Saturday, 3 February 2018

"अच्छे दिन" च्या गोष्टी





३ वर्षांपासून काही "अच्छे दिन" च्या गोष्टी सतत ऐकू येत आहेत.(या आधीही shining india, गरिबी हटाव होऊन गेलंय म्हणा..)

              ✍ संदिप घायवट
      दि: ०३ फेब्रुवारी, २०१८
                      sandipkghaywat@gmail.com

खतांवर "निम कोटिंग" केल्यामुळे हजारो कोटी वाचले.

DBT मुळे हजारो कोटी वाचले.

आधार लिंकिंग मुळे शेकडो कोटी वाचले.

आधार व बँक खाते लिंकिंग मूळे अमूक एक कोटी वाचले व खूप फायदे झाले.

अशा अनेक प्रकारे वाचलेल्या पैश्यांचं काही होतंय की नाही? काय होतंय याचं पुढे?

इन्फ्रा डेव्हलपमेंटमध्ये पैसे ओतले जाताहेत असं म्हटलं जातं. पण शाळा तितक्याच बकाल आहेत. त्या उलट १३०० शाळा बंद करतय महाराष्ट्र सरकार. दवाखाने तितकेच भकास आहेत. सरकारी कार्यालयं अजूनही मध्ययुगीन काळातली वाटतात. कुठे जात आहेत पैसे?
.
१०० शहर स्मार्टसिटी बनवणार असल्याच्या जाहिराती आल्या होत्या, पुढे काय झालं बरं??

बर प्लॅटफॉर्म तिकीट अन रेल्वे चे भाडे वाढवलेत, मात्र सुविधा पहिल्या पेक्षा अधिक खराब झाल्या.अपघातांचे प्रमाणही वाढलं. स्टेशनला Wi-Fi बसवले अन करोडो रुपये गूगल च्या घशात ओतले अन मुतायला जायचे मात्र पैसे सुरू केले.म्हणजे प्राथमिकता कशाला द्यावी याचे ही भान राहिले नाही की काय??त्या करोडो रुपयांत शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली नसती का?

लोकांनी "देशासाठी गॅस सबसिडी सोडली" म्हणजे स्वतःच्या खिशातून देशासाठी खारीचा वाटा उचलला. ह्या खारीच्या वाट्यातून कोणता विकास सेतू बांधला जातोय? आकडेवारीच्या पल्याड काही दृश्य परिणाम दिसताहेत का?

मुद्रा योजनेतील कर्जातून उभ्या राहिलेल्या उद्योजकांचे डोळे विस्फारणारे आकडे दिसतात. पण मी व्यक्तिशः ओळखतो अश्या एका माणसाला सुद्धा कर्ज मिळालेलं नाही. प्रत्येकाची, एकाचवेळी, संतापजनक आणि हताश वाटण्याजोगी, कहाणी आहे.

मेक इन इंडिया च्या मार्केटिंगकडे बघून त्या अफाट कर्जाचं दडपण येतं. पण वाटतं "देश" "तरक्की" करणार असेल, "आगे बढणार" असेल तर हा खर्च सार्थकीच लागणार. पण मेक इन इंडियाचा ताळेबंद दिवाळखोरीसारखा भासतो. माझ्या नात्यातील एकाला त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सेट अप बंद करावं लागलंय. कुटुंब उद्धवस्त झालंय - बँक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या हप्ते गिरीमुळे.

स्किल इंडिया मुळे सरकारी अनुदानं मिळवून लोकांनी आपापली स्किल डेव्हलपमेंटची दुकानं थाटली. पण त्यातून घडलेली स्किलफुल जनरेशन दृष्टीस पडत नाही. अजूनही उद्योगांना हवी असलेली एम्प्लॉएबल तरुणांची फळी प्रकट झालेली नाही.

नोटबंदी नंतर तर भ्रष्टाचार, अन दाहशतवादी कारवाया बंद होणार होत्या? त्याचं काय झालं? त्याचे परिणाम असे झाले की शेकडो गरीब व सामान्यांची आर्थिक अवहेलना व कोंडी झाली. नाहकचा शारीरिक व मानसिक  त्रास झाला. अनेक सामान्य व वृद्धांचे रांगेतच बळी गेले. आर्थिक विकास वृद्धी दर कधी नव्हे इतका खालावला. श्रीमंतांचे पैसे मात्र कोठेही ATM व बँकांच्या रांगेत उभे न राहताच पांढरे झाले.
.
देशाच्या प्रधान सेवकांनी सातत्याने हजारो कोटींचे परदेश दौरे केले. त्या परदेश दौऱ्यातून फलित काय? किती परदेशी गुंतवणूकदार आले? की त्याउलट आपल्यालाच जपान कडून हजारो रुपयाचं कर्ज घ्यावे लागलंय. Foren investors, exchange मुळे डॉलर,युरो व येन वधारत असून रूपया दिवसागणिक घसरत का जातोय??
.
Zee studio च्या बाहेर "पकोडे बेचना" रोजगार निर्मिती म्हणणारे प्रधानसेवक 2 करोड रोजगार देऊ शकले नाहीत हे विदारक सत्य लपवू पाहताहेत. नाय म्हणजे उद्या सकाळी घरातील कर्त्या माणसाचा रोजगार गेल्यावर घरातील स्त्री धुनी भांडी मुलगा गॅरेज अन मुलगी शिवणकाम करायला लागली तर हे एका ऐवजी तीन रोजगार निर्माण झालेत असे देखील रेटून विजयी मुद्रेत सांगतील अन भक्त त्यावर टाळ्या देखील वाजवतील.
.
अनेक भक्तांना किंवा तत्सम अडाण सोटाना माझा हा "नकारात्मक चित्र चितारण्याचा " उद्योग वाटण्याची शक्यता आहे. पण अशांची चिंता नाही. असे चाटे भक्त मला troll, काँग्रेसी, आप, पुरोगामी अथवा देशद्रोही सुद्धा म्हणण्याची हिंमत करतील. आशा भक्ताना मागील ७० वर्षांनंतर आता संधी प्राप्त झालीय सत्तेच्या रूपानं त्याचा गैरफायदा अन गैरवापर करतायत, बाकी त्यांना सद्बुद्धी येवो हीच कामना... काही भक्त असा भंपक युक्तिवाद देखील करतील की, बदल घडायला वेळ लागतो वगैरे..वगैरे. मी म्हणतो ते सगळं ठीक आहे हो. वाट बघण्याची तयारीसुद्धा आहे.

पण आजूबाजूचं वास्तव अन त्याच्या अगदी विपरीत, सगळं काही आलबेल असणारे आकडे बघून गणित साफ चुकल्यासारखं वाटतं.

देश बदलतोय, नव्याने उभा रहातोय म्हटल्यावर काही तरी लक्षणं दिसायला हवीत... बोगस आकडेवारीच्या पल्याड ती दिसत नाहीयेत.

किमान Primary System  दिसण्यासाठी वाट किती बघायची, कळत नाहीये.
.
नाय म्हणजे देशाच्या विकास पुरुषाने ६० महिने मागितले होते ते संपत आलेत याची जाणीव नाही वाटतं साहेबांना....
.
पाकिस्तानमधील पेशावर मध्ये झालेल्या हल्याचे twitter वरून निषेध नोंदवणारे कार्यतात्पर प्रधानसेवक करणी सेनेन  केलेल्या हल्ल्याच्या वेळेस जाणीवपूर्वक काहीही बोलत नाहीत का?? रामराहिम समर्थक असतील नाहीतर भीमकोरेगाव व कासगांज मध्ये दंगा करणारे नारंगी गुंडे असतील अशा विकृत मानसिकतेला वेळीच चाप का लावला जात नाही?? खंबीर अन कणखर नेतृत्व काय.. घालून बसतंय का अशा वेळेला, सरकारचा जरब कुठे जातो तेव्हा?? की मूक समर्थन करतंय या सगळ्याच?
.
अखलाख असेल नजीब असेल चंदन असेल जमावाकडून होणाऱ्या या हत्त्या आहेत. चीन ला लाल आख अन पाकिस्तानला त्याच्या भाषेतच उत्तर देऊ म्हणणारे प्रधानसेवक देशांतर्गतच उठणाऱ्या या हिंस्र जमावाला का थोपवत नाहीत? की त्या उलट  गौरक्षणाच्या व देशभक्तीच्या नावाखाली हिंसा करणाऱ्या तत्सम जमावाला कोणतीही ठोस कारवाइ न करता अभयच देत आहेत.

विकास पटापट फक्त अमितशहाच्या मुलांचाच होणार, अन खिरापत वाटल्यागत पतंजलीला भूखंड देणार...
.
विकास कुणाचा आमदार खासदारांचा?? पगार वाढणार अन पेन्शन घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा??.....
.
विकास होतोय तर कर्ज जपानकडून घेऊन bullet ट्रेन गुजरात ला?? ७३% संपत्ती १% देशातील लोकांकडे आली अन विकास कुणाचा करताय कळत नाय व्हय आम्हाला?? लाभार्थी लाभार्थी म्हणता अन धर्मा शेतकऱ्याचा जीव घेता हे काय दिसत नाय व्हय शेतकऱ्याला...master of fekology from gujarat university जगाला माहीत झालं ना राव आता...वंदे मातरम वंदे मातरम म्हणता अन चुत्या बनवायचे धंदे मातरम करता हे काय कळत नाय व्हय जनतेला..
२ करोड नोकऱ्या देऊ सांगता अन ४ वर्षात याच्या २५% देखील रोजगार निर्माण नाय केला. उलट IT व इतर ठिकाणी लाखोंच्या नोकर्या गेल्या हे काय विसरतील होय? गरीब हू गरीब हू म्हणायचं अन १० लाखाचा सूट घालायचा. ज्या योगी ला साधं बोलायची पद्धत नाय ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्याला मंत्री करता म्हणजे किती स्वच्छ राजकारण करताय तुम्ही हे काय सांगायला पाहिजे का जनतेला??
ज्या aadhar, GST,FDI सारख्या योजना नाकारल्या त्याच आता स्वीकारता म्हणजे तुमची बुद्धिमत्ता कळतंनाय व्हय आम्हाला...
.
या देशात,या मातीत जन्माला आलेला प्रत्येक माणूस या मातीचा व या देशाचा जन्मजात वारसदार आहे यात कुणाचं ही दुमत असणार नाही. तो मुलगा असो मुलगी असो. मुस्लीम असो ख्रिश्चन असो नाहीतर इतर कोणत्याही जात, धर्म अन वंशाचा असो...
सगळे जर या देशाचे वारसदार, मालक असतील तर सगळे बांधव समान असले पाहिजेत. सर्वांना समान हक्क असले पाहिजेत. या देशाच्या सर्व प्रकारच्या संपत्तीत सर्वांचा समान वाटा हक्काने असला पाहिजे. जर तो नसेल तर तो सर्वांना समान मिळावा यासाठी प्रयत्न व्हावयास हवेत. हीच सामाजिक न्यायाची, प्रगतीची, बंधुतेची भूमिका असावयास हवी.

क्रमशः