Tuesday, 25 May 2021




 


बुद्ध जयंती, वैशाख पौर्णिमा, वेसाखमासो

 तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात वैशाख पूर्णिमेस विशेष महत्त्व आहे; कारण तथागताच्या जीवनात अतिशय महत्वपूर्ण पाच अशा ऐतिहासिक घटना या दिनी घडून गेल्या आहेत.


१. पहिली घटना.

जन्म

 कपिलवस्तु नगरीचे महाराज शुद्धोधन व महामाया यांचे राजपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म. महामाया माहेरी जात होत्या. माहेर देवदह हे कपिलवस्तू पासून पूर्वेला १८ किलोमीटर अंतरावर होते. नेपाळ आणि देवदहाच्या मध्ये नेपाळच्या ताराई भागात लुंबिनी नावाचे एक सुंदर उपपवन प्रवासात होते. तेथे अनेक  शालवृक्ष होते. तेथील. फुला-फळांनी बहरलेल्या वनात महामाया थोडा वेळ थांबल्या. एका शालू वृक्षाची झुलणारी फांदी पकडण्यासाठी त्यांनी हात वर केला आणि हलकेसे उंच उचलल्या गेल्या आणि त्यामुळे प्रसवपिडा आरंभ होऊन उभ्याउभ्याच त्यांनी सिद्धार्थ  गौतमाला जन्म दिला. तो दिन होता विशाखा नक्षत्र, मंगळवार वैशाख पौर्णिमा ई. स.पूर्व ५६३.


२ .घटना दुसरी.

यशोधरा यांचा जन्म


 सिद्धार्थ गौतमाच्या धर्मपत्नी  यशोधरा यांचा जन्म कपिलवस्तु नगरीच्या शेजारी रामनगर नावाचे कोलीय राज्याचे राजा दंण्डपाणी यांच्या राजमहालात झाला.


 ३. घटना तिसरी. 

विवाह


 यशोधरेच्या वडिलांनी तिच्या सोळाव्या वर्षी तिचा स्वयंवर सोहळा ठरविला. स्वयंवर सोहळ्यात सिद्धार्थ गौतम यांनी  एका अनियंत्रित घोड्याला आपल्या अश्वलक्ष विद्येने काबू केले आणि त्यावर स्वार झाले. याशिवाय त्यांनी लिखितज्ञान, संख्याज्ञान, बालविद्या, काव्य, व्याकरण, पुराने इतिहास वेद ज्योतिषसांख्य इत्यादी विषयांमधील त्यांचे निपुणता सिद्ध केली.स्वयंवरात सर्व राज्यांच्या, राजपुत्रांच्या आणि प्रियजनांच्या साक्षीने वैशाखी पौर्णिमा ई. स.पूर्व ५४७ या दिनी हा विवाह सोहळा संपन्न झाला.


 ४. घटना चौथी.

ज्ञान प्राप्ती


 राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांस सम्यक संबोधी प्राप्त होऊन चार आर्यसत्य, प्रतीत्य, समुत्पाद इत्यादी सिद्धांताचे ज्ञान प्राप्त झाले. त्यावेळी वय ३५ वर्षांचे होते. तो दिवस होता बुधवार वैशाख पौर्णिमा ई. स.पूर्व ५२८.


५.  घटना पाचवी. महापरिनिर्वाण

भगवान बुद्धांचे वय आता ८० वर्ष झाले होते. भगवान बुद्ध व संघाला चुंद नामक व्यक्ती जो व्यवसायाने लोहार होता. त्याने भोजनदानासाठी घरी आमंत्रित केले. चुंदने सूकरमद्दव नावाच्या कंदमुळ वनस्पतीचे उत्कृष्ट व चविष्ट भोजन तथागत व संघास अर्पण केले. परंतु त्यानंतर तथागतांची प्रकृती बिघडली. शेवटी प्रवासात कुशिनारा येथे मल्लांच्या उपवत्तन शालवनात दोन शालवृक्षांच्या मध्ये आराम करण्यास तथागत थांबले. त्यावेळी भिख्खूंना संस्काराच्या अनित्यतेचा उपदेश केला.

"अनिच्चा व्रत संखारा, उप्पादवय धम्मिनो उपजित्वा निरूज्झान्ति तेसं द्रपुसमो सुखो ".

अर्थात: हे भिक्खुंनो हे सर्व संस्कार नाशवान आहेत तुम्ही अप्रमादी राहून आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करा.

त्यानंतर भगवान बुद्धाने ई. स.पूर्व ४८३ वैशाख पौर्णिमेच्या रात्री अंतिम प्रहरी महापरिनिर्वाणात प्रवेश केला.

0 comments: