भारतीय वंशाच्या राजाचे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे राज्य, मुघल साम्राज्य पेक्षाही १० लाख चौरस किलोमीटर मोठे असे असलेले साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. साम्राज्य ५० लाख चौ.किमी पसरलेले होते.
सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या दीक्षेनंतर शांती व अहिंसेने बांधून ठेवले होते. हे खरे आहे की सम्राट अशोकाने सीमेवरील सैनिक खालसा केले नाही.. कारण अहिंसा म्हणजे आत्मघात नव्हे. मात्र कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाच्या काळात युद्ध झाले नाही.
भारतीय मातीतील तत्त्वज्ञान,विद्या, योग, व धम्म जगात पोहचवण्याचे काम सम्राट अशोकाने केले. नालंदा, तक्षशिला सारखी विश्वविद्यालय त्याने निर्माण केली. त्याने ८४ हजार स्तूप जंबुद्विपावर बांधले.
राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्र प्रवर्तनाचेच प्रतिक आहे!
भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे.
राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात‘धर्मचक्रप्रवर्तन’
असे कोरलेले आहे. आपल्या भारतीय चलनावरील सारनाथचे चार सिंह हे देखील चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या साम्राज्याची ओळख आहे.
भारताच्या इतिहासात एकच असा 'एकमेव'
म्हणण्यासारखा कालखंड आहे, तो स्वातंत्र्याचा
काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा सुवर्ण
काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मोर्या
सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.
ह्या भारतीय उपखंडात पहिले धम्मचक्र प्रवर्तन बुध्दाने सारनाथ येथे केले.....
बुध्दाचे अनुयायी सम्राट अशोक ह्यांनी विजयादशमी या दिनी दुसरे धम्मचक्र प्रवर्तित केले .....
बाबासाहेबांनी ह्याच अशोक विजयादशमीदिन निवडुन तिसरे धम्मचक्र प्रवर्तित केले ......
बाबासाहेबांनी देखील अशोक विजयादशमीहा दिवस धम्मदिक्षेसाठी निवडला.
जगातील सर्वातमोठे अहिंसक मार्गाने केलेले धर्म परिवर्तन... इसवीसनाप्रमाणे ती तारीख १४/१०/१९५६ अर्थात अशोक विजायादशमी....
अशोक विजयादशमीच्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा
भवतु सब्ब मंगलम!!!
0 comments: