भाग -०१
ज्याप्रमाणे कस्तुरबाई गांधी व लक्ष्मी यांच्यामध्ये सापत्नभाव आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी व अस्पृश्यता यांच्यामध्येही थोडासा सापत्नभाव आहे असे म्हणावे लागते. कारण ते जितका खादी प्रसार व हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य यावर भर देतात तितका अस्पृश्यतानिवारण यावर देत नाहीत. तसा जर त्यांनी दिला असता, तर ज्याप्रमाणे काँग्रेसच्या बाबतीत सुता वाचून मत नाही असा त्यांनी हट्ट धरला त्याप्रमाणे अस्पृश्यतानिवारणा वाचून काँग्रेसमध्ये शिरकाव नाही असाही आग्रह त्यांनी धरला असता. असो. जिथे कोणीच जवळ करीत नाही तेथे महात्मा गांधींनी दर्शवलेली सहानुभूती काही कमी नाही. 【संदर्भ मा.फ गांजरे संपादक पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे खंड २ १९७४ पृष्ठ क्रमांक २】
अस्पृश्यता निवारणाचा गांधीजींनी आग्रह धरला तरी तो प्रश्न त्यांना स्वराज्यप्राप्तीचा तसेच हिंदू-मुस्लिम इतक्या इतका निकडीचा वाटत नव्हता, अशी तक्रार एकटे आंबेडकरच करीत होते असे समजण्याचे कारण नाही. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सारखा सवर्ण हिंदू तील करता समाज सुधारक ही गांधीजींना याबद्दल बोललावीत होता, हे लक्षात घ्यावयास हवे. २५ नोव्हेंबर, १९२४ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी गांधीजींना धाडलेल्या पत्रात लिहिले होते. तुमच्या हृदयात प्रथम स्थान खादिला, हिंदू-मुस्लिम ऐक्याला दुसरे आणि अस्पृश्यता निवारणाचा तिसरे स्थान आहे. 【संदर्भ म. प. मंगुडकर आणि इतर संपादक पुस्तक धर्म जीवन व तत्त्वज्ञान महर्षी विठ्ठल रामजी शिंदे १९७९ पृष्ठ क्रमांक ६६३ ते ६६५】
१९०६ सालापासून डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीचे संस्थापक विठ्ठल रामजी शिंदे जातिव्यवस्थेमुळे अस्पृश्य समाजावरील होणारे अन्याय तसेच हिंदू समाजातील विषमता दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागले होते. त्याच वर्षी स्थापन झालेल्या मुस्लिम लीगने अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती हिंदूंपेक्षा वेगळे असून विधानमंडळातील जागांचे वाटप हिंदू व मुसलमान यांच्या लोकसंख्येतील प्रमाणावरून करताना अस्पृश्यांची गणना हिंदूंमध्ये करू नये असे म्हणण्यास सुरुवात केली. या याचा अर्थ व दूरगामी परिणाम लक्षात घेऊन काही सवर्ण हिंदू नेते अस्पृश्योद्धाराचे भाषा करू लागले.
गांधीजींनी अस्पृश्यता निवारण करण्याचे प्रयत्न केले ते सत्याग्रहाच्या मार्गाने नव्हे तर स्पृश्यांचे केव्हा ना केव्हा तरी हृदय परिवर्तन होईल अशी आशा बाळगून त्यासाठी दीर्घकाळ थांबण्यास गांधीजी तयार होते.
आपण हिंदू आहोत एवढे म्हणणे गांधीजींना पुरेसे वाटत नसे तर आपण सनातनी हिंदू आहोत असा ते दावा करीत असत. आपली वेदांवर, उपनिषदांवर पुराणांवर आणि रामायण व महाभारत यांसारख्या हिंदूंच्या धर्मग्रंथांवर श्रद्धा आहे; त्यामुळे अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पना आपल्याला मान्य आहेत, असे गांधीजी जाहीर रीत्या म्हणत असत. गोरक्षणावर माझा विश्वास आहे, मूर्तीपूजेवर माझी श्रद्धा नाही असे नाही, असेही गांधीजी म्हणत असत 【संदर्भ म. गांधी हिंदूधर्म १९७८ पृष्ठ क्रमांक ९】
१९२१ ते १९४७ या काळात महात्मा गांधींच्या वर्ग जातिव्यवस्थेबाबत चे मतांमध्ये हळूहळू बदल होत गेले. आरंभी सहभोजन व आंतरजातीय विवाह करणे हे अस्पृश्यता निवारण्यासाठी आवश्यक नाही असे गांधीजी म्हणत असत. आपल्या आश्रमात दुधा भाई हे अस्पृश्य इतर अश्रमास यांबरोबर बसून भोजन करीत असला तरी आपण असे व बाहेरच्या कुणालाही त्याचे अनुकरण करण्याची शिफारस करणार नाही. मग आपल्याला कोणी ढोंगी म्हटले तरी चालेल असे असहकार आंदोलनाच्या काळात गांधीजी सांगत असत. 【संदर्भ एमके गांधी हिंदूधर्म १९७८ पृष्ठ क्रमांक १०३ ते १०५】
बॅरिस्टर आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेंनंतर मिस्टर गांधी म्हणाले होते की आंबेडकरांनी हिंदू धर्मग्रंधांचा अभ्यास करावा. अस्पृश्यता आता उरली नाही असे मत गांधींचे त्यावेळी होते. बॅरिस्टर आंबेडकर १९२४ ते १९३५ पर्यंत गांधी व हिंदू धर्म यावर जहरी टीका करत नसत. एव्हाना काळाराम मंदिर प्रवेशावेळी सत्याग्रहाचा गांधींची तसबीर सभा मंडपात होती.
पण हळू-हळू आंबेडकरांच्या लेखनाची व भाषणाची धार वाढत होती. गांधी व वेद, पुराण, गीता, वर्णाश्रम यावर अनेकदा जाहीर कडवी मुद्देसूद टीका आंबेडकरांनी केली आहे. 【What gandhi and congress done with untouchables? Anhilation of caste. Riddles in Hinduism.】
या उलट कालांतराने बॅरिस्टर गांधींना स्वतःमध्ये बदल करावे लागले. सहभोजन व आंतरजातीय विवाहाबाबत ते सकारात्मक झाले.
यात मला आंबेडकरांचा द्रोष्टेपणा, कालसुसंगतपणा, जाणवतो. आजमितीला आंबेडकर आर्थिक, सामाजिक, राजकीय रित्या किती काल सुसंगत आहेत हे सांगावयास नको. आंबेडकर आज सर्वव्यापी आहेत ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. या पुढेही कालसुसंगत ते टिकेल.
क्रमशः
0 comments: