भाग -०२
श्रमविभागणी वर आधारलेली चातुर्वर्ण्याची पद्धती ही आदर्श समाज व्यवस्था होती असे गांधीजी मानीत असत. आवर्ण किंवा पंचम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्पृश्यांची गणना क्षुद्र या चौथ्या वर्णामध्ये करणे योग्य होईल असे त्यांना वाटत असे. मूळच्या चार वर्णांचे तुकडे पडून चार हजार जाती झाल्या कारण जात धर्म धिष्टित असते, तर वर्ण गुण आणि कर्मावरून ठरतो. चार वर्गांच्या व्यवस्थेमध्ये विषमता नाही, तर समानता आहे. कारण ही चारी वर्ण ही एकाच विश्वव्यापी पुरुषाच्या देहाचे चार अविभाज्य आहेत असाही ऋग्वेदातील पुरुष सुक्तातील ऋचेचा गांधीजी अर्थ लावीत असत. चतुवर्णचे पुरस्कर्ते भगवत्यागीतेतील चौथ्या गुणकर्म विभागनी: हे श्रीकृष्णाचे वचन नेहमी ते उधृत करीत असत. 【संदर्भ संदर्भ एम.के गांधी भगवद्गीता १९८० पृष्ठ क्रमांक १२३, १२४】
गीता म्हणजे अमृत, त्यातील श्लोक म्हणजे प्राणवायु, गीता म्हणजे कल्पवृक्ष तिची श्रद्धापूर्वक पठण व मनन करावे असे गांधीजी सांगत असत.
गांधीजींच्या मते आपल्या काळात खऱ्या अर्थाने वर्ण आढळत नाहीत. वर्ण म्हणजे सहभोजन वरील आणि आंतरजातीय विवाह वरील निर्बंध एवढाच त्यांचा मर्यादित अर्थ उरलेला आहे. वर्ण म्हणजे कार्याची विभागणी. त्यामुळे वर्णव्यवस्था ही केवळ हिंदू धर्म पुरती मर्यादित नसून ती जगात सर्वत्र आढळते आणि कोणत्याही काळात ती टिकते. या अर्थाने वर्ण व्यवस्थेसाठी प्राण देण्यासही माणसाने तयार असावे असे गांधीजींना वाटत असे. मुमुक्षु म्हणजे समाजाचा सेवक. आपली कर्तव्य म्हणजे समाजाने सोपवलेले कार्य ते केल्यास माणसाला मोक्ष मिळू शकतो असे गांधीजींचे मत होते.
ते म्हणत माझ्या मते वर्णाश्रमाच्या प्रश्नाचा धार्मिक दृष्ट्या विचार करताना शंभुकाच्या सारखी उदाहरण देऊ नये. 【संदर्भ एमके गांधी पुस्तक हिंदू धर्म १९७८ पृष्ठ क्रमांक ५६】
१९२७ साली महाड सत्याग्रहा संबंधी लेख आपल्या बहिष्कृत भारत वर्तमानपत्रात लिहिताना गीतेचा आधार घेणाऱ्या आणि श्री कृष्णाचा उल्लेख परमात्मा भगवंत अशा शब्दात करणारे डॉक्टर आंबेडकर यांची श्रीकृष्ण विषयी तसेच गीते विषयाची मते कालांतराने पार बदलली. २४ सप्टेंबर १९४८ रोजी मद्रास येथे केलेल्या भाषणात त्यांनी वेद व गीता हे ग्रंथ खोडसाळ व बाष्कळ असल्याचे आपले मत दिले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली डॉक्टर आंबेडकरांनी हिंदूंचा धर्मग्रंथ त्यांची निंदा-नालस्ती केली म्हणून ठीक ठिकाणी जाहीर सभा घेऊन निषेधाचे ठराव मंजूर करण्यात आले. आंबेडकर वाड्मयाच्या तिसऱ्या खंडात भगवद्गीता विषयी निबंध या मथळ्याखाली डॉक्टर आंबेडकर यांची अप्रकाशित टिपणी छापलेली आहेत. पृष्ठ क्रमांक ३५७ ते ३८०. या टिपणात भगवद्गीता ही बायबल कुराण किंवा धम्मपद याप्रमाणे धर्मग्रंथ नाही तसेच तो तत्वज्ञानावरील प्रबंध ही म्हणता येणार नाही असा डॉक्टर आंबेडकरांनी अभिप्राय दिला आहे. गीतेत श्रीकृष्णाने युद्धाचे आणि त्यातील हत्येचे तात्विक समर्थन केले आहे. आत्मा अमर असतो आणि शरीर हे नष्ट होते असे सांगून युद्ध आणि त्यांच्या हत्या यांच्यामुळे पश्चाताप करण्याची किंवा लाज वाटण्याचे कारण नाही असे कृष्ण सांगतो असे डॉक्टर आंबेडकरांच्या मते गीता प्रतिपादन करते.
खुनाचा आरोप असलेल्या अशिलाच्या वतीने खटल्यात श्रीकृष्ण बचाव पक्षाचे वकील म्हणून समजा आज न्यायालयात उभा राहिला असता आणि त्याने भगवत गीतेत केली आहे तसेच हत्येचे समर्थन केले तर त्याला वेड्याच्या इस्पितळात धाडले जाईल हे निसंशय. डॉक्टर आंबेडकरांचे ही टिपणी ४३ वर्ष अप्रकाशित राहिली तरी १९४४ साली त्यांनी एका सभेत भगवद्गीता यांच्यासंबंधी पुणे येथे जाहीर भाषणात वेदांची निर्मिती ही एक वेड्या व मूर्ख लोकांची कार्य आहे असे उदगार काढले होते, तसेच वर्णाश्रमाच्या स्थर्यासाठीच गीता सांगितली गेली असेही ते म्हणाले होते ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावयास हवी. 【पुस्तक कित्ता पृष्ठ क्रमांक ५४】
श्रीराम आणि शंभू काशी त्याचा शिरच्छेद कसा व का केला ही कथा डॉक्टर आंबेडकरांनी रामाचे कोडे गर्डन्स ऑफ राम उलगडून दाखवताना सांगितला आहे.【खंड ४ पष्ट ३३२】
क्रमशः
0 comments: