इथला सो कॉल्ड मीडिया अथवा पुरोगामी दलितांचे मूळ प्रश्न कधीच मांडणार नाही. इथले विचारवंत आणि बुद्धिजीवी फक्त चकाचौन्द आणि विचारांची झालर पांघरून तुम्हाला मोह जाळयात घेऊन स्वतः मोठे होतील. दोनचार दलितांच्या स्वार्थी नेत्या अन चाटु चमच्यांच भलं करतील. आणि पुरोगामी, समाजसेवक, समाजसुधारक असल्याचा गावभर आव आणतील स्वतः ची प्रतिमा प्रतिस्थापना करून मग NGO टाकून करोडो कमवतील. आशा मुखवटे धारी लोकांपासून दलितांनी सावध राहिले पाहिजे. अशा मुखवट्यांना आपण समर्थन देऊन मोठेतर करत नाहीत ना हे तपासलं पाहिजे.
पितळ, #तांबे, अन #सोन ओळखता यायला हवं व योग्य #दिशा स्वीकारायला हव्यात. नाहीतर हरीहरी (कन्हैया) करत ##नरकेत जावं लागेल. #आठवलं म्हणून सांगतोय.
सो कॉल्ड सवर्ण हा हजारो वर्षापासून सत्ता संपत्ती ज्ञान याचा पूर्ण लाभ, उपभोग घेतोय. त्याला मिळालेल्या अमर्याद संधीतून त्याने सगळीकडे सत्ता काबीज केली आहे. आज तो develop दिसतोय त्याचं कारण तो पिढ्यानपिढ्या याचा वापर करून संपन्न, तरबेज झालाय. आजही जल, जमीन, जंगल ही याच उच्चभ्रुनची मालकी आहे. दलितांकडे आरक्षण आणि संविधान या पलीकडे काहीही survival साठी आधार नाही. ते ही स्वातंत्र्यापासून आजतागायत अधिक धोक्यात येत आहे. ज्यांची पहिली अथवा दुसरी पिढी आता शिकतेय त्यांची स्पर्धा सर्व संपन्न सवर्ण समाजाशी होऊ शकत नाही. जिथे धर्मांधता, जातबंधु लॉबिंग, खोटे मेरिटधारी विद्वेषी असतील. Step by step evolution and revolution, delvelop नावाचा प्रकार असतो की नाही?
हा सवर्ण दोन्ही तिन्ही चारी बाजूच नेतृत्व आपल्याच हातात ठेवतो. ते समाजवादी, संघवादी, मार्क्सवादी, धर्मवादी, पुरोगामी , कला क्रीडा, ज्ञान राजकारण सगळीकडे यत्र तत्र सर्वत्र आपले नेतृवत उभे करत असतात. आंबेडकरवाद्यांमध्ये देखील हे घुसलेत... आंबेडकरवाद्यांनी दाई आणि माई यातला फरक वेळीच ओळखला पाहिजे.
आंबेडकरवाद्यांनी धार्मिक, वैचारिक, राजकीय प्रतिक्रांती पासून अर्थात सवरणांच्या मुखवट्या पासून आणि आपल्यातील चाटुगिरांपासून सावधान राहिले पाहिजे.
आंबेडकारवादी विचारधारेला धोका या पांचट, गुळचट, बोटचेप्या, घरभेदया,आळशी, घरकोख्या, सोंगाड्या, दिखावू धम्म आचरण, आंबेडकरवादी मुखवट्यापासून देखील आहे.
0 comments: