०५ जानेवारीस नालंदा शाखेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातील मनोगत मांडले ते पुढील प्रमाणे.
बुद्धांनी वज्जींना केलेला संदेश आपणास ज्ञात आहे .
हत्तीस आवरी गवती दोर ।
मुंग्या हि सर्पासी करिती जर्जर। व्याघ्रसिंहसी फाडीती हुशार।
रानकुत्रे संघटोनी।
तुकडोजींच्या या कवनांची महती देखील आपण जाणता.
लक्षात घ्या. या देशात विषमता आहे. या विषमतेचे कारण केवळ आर्थिक नसून सामाजिक आहेत. जन्मासोबत जात नावाच लेबल चिटकवून व्यक्तीची प्रतिष्ठा, ओळख, कला-गुण, सामाजिक ओळख, संसाधनांची उपलब्धता यांना एक मर्यादेचे बंधन जन्मभर बांधले जाते.
ही विषमता व ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक,आर्थिक व राजकीय मुठभरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी. स्वतंत्र्य, समता, बंधूत व न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी संघटनेची गरज भासते.
कारण तुम्ही व्यक्तीशी लढत नसून सिस्टीम सोबत लढत आहात. केवळ लढत नसून एक पर्यायी सिस्टीम उभी करू इच्छिता. त्यामुळे हा लढा सर्व अंगानी विषमतावादी, सरंजामी, जातीयवादी विचारांच्या, व्यक्तींच्या व संघटनेच्या विरोधात आहे.
लक्षात घ्या. तेथे व्यक्तीची मुक्ती किंवा आर्थिक उद्धार शक्य आहे. तुम्ही विषमतावादी टोळक्यात जाऊन त्यांच्या अजिंड्याखाली माना डोलवू शकता. परंतु त्याने समाजाची अथवा सामूहिक मुक्ती शक्य नाही. किंबहुना विषमता वादी शक्ती तुमचा वापर संपला की तुम्हाला देखील कचऱ्याप्रमाणे फेकून देतील.
या क्रांती प्रतिक्रांतीच्या लढ्यात स्वतःला जन्माने उच्चभ्रू समजणारा समाज कायम संघटित,शिक्षित व पर्यायाने सत्तेशी सलगी करत आपले प्रस्थ कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. सत्तेशी सलगी त्यांनी इंग्रजांच्या काळात केली. मुस्लिम साम्राज्याच्या काळात केली. स्वातंत्र्यानंतर देखील सत्तेत राहुल मलिदा खाण्याचे व बहुजनांचा मलिदा करण्याचे काम अथक अविरत सुरू आहे.
त्यांच्या या यशाचे गमक हा त्यांचं शिक्षण, संघटन, अजिंडा व लबाडी हे आहे. या सगळ्याचा वापर ते विषमतावादी व्यवस्था टिकवण्यासाठी करतात.
या सिस्टिमला पर्याय आपण शिक्षित संघटित व जागृत होऊन आपल्या अजिंड्यावर काम करून दिला पाहिजे.
तत्पूर्वी हे समजून घ्या की, सिद्धार्थ बुद्ध झाले व त्यानंतर त्यांच्या हातून ४५ वर्ष परिवर्तनाचे कार्य झाले. बोधिसत्व बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन समाजाच्या उद्धारासाठी दिले. जे जे प्रबुद्ध झाले बोधी झाले त्यांनी परिवर्तनाची कास पकडली.
कार्यकर्त्याने त्यासाठी पंचशिलाचे व शिलमार्गाचे महत्व जाणले पाहिजे. शील समाधी प्रज्ञा न जाणता. पंचशील न अंगीकारता काम करणारे कार्यकर्ते अनेकदा भरकटण्याचे व चळवळीला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम जाणते अजाणते करू शकतात. त्यामुळे चळवळीत झांगडगुत्ता, संभ्रम देखील झाले. हेही लक्षात घ्या. जातीसंस्थेचे निर्मूलन करा. जातीभेद, धर्मभेद यांना तितकेसे महत्व नाही. शिक्षण व आर्थीक सबलीकरण करा.
धन्यवाद 🙏

0 comments: