नाशिकच्या १२ किलोमीटर आणि उत्तरेस आंबे दिंडोरी नावाच गाव आहे. येथेच लोकनेते पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1902 रोजी पवळाबाई यांच्या पोटी झाला. त्याच मुलाचे नाव किसन भाऊंनी भाऊराव असे ठेवले.
०१ जानेवारी 1927 रोजी कोरेगाव जिल्हा पुणे येथील विजय स्तंभावर झालेल्या सभेत भाषण करून दादासाहेब गायकवाड यांनी आपले नाव प्रथम महाड येथील सत्याग्रहात भाग घेण्यासाठी नोंदवली होते आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात त्यांचे नाव एक सत्याग्रही म्हणून नोंदवली होते. त्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.
20 मार्च, 1927 परिषदेच्या शेवटी जो हल्ला होता. त्याची सर्व इथंबूत माहिती नावांनीशी गोळा केली आणि निरपराराध अस्पृश्यांवर एकदम हल्ला करणाऱ्या गुंडाविरुद्ध कोर्टात खटले भरले गेले चार- पाच महिन्यांनी त्या खटल्याचा निकाल लागून सात-आठ गुंड मोरक्यांना प्रत्येकी चार महिन्यांची सश्रम करावासाची शिक्षा देखील झाली. यासगळ्यात दादासाहेबांनी काम केले होते.
इसवी सन 1930 साल उजाडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 2 मार्च, 1930 रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची रणशिंग फुंकले.
रविवारी 13 ऑक्टोबर, 1935 रोजी येवला येथील परिषद भरली. अस्पृश्य समाजातील सुमारे 50 हजार लोक त्या परिषदेला हजर होते. या परिषदेचा प्रचार करताना दादासाहेब आपल्या सहकाऱ्यांसह कधी पाई कधी सायकलवर तर क्वचित मोटरने प्रवास करीत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन. दादासाहेब गायकवाड यांना 16605 मते 25 फेब्रुवारी 1937 रोजी पडली व त्यांचा विजय झाला.
14 एप्रिल 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 45 वा वाढदिवस येवला येथे मोठी जाहीर
परिषद घेऊन साजरा करण्यात आला या परिषदेत दादासाहेबांचे बाबासाहेबांनी अभिनंदन केले.
बाबासाहेबांच्या पश्चात बाबासाहेबांच्या शवाला साक्ष ठेवून दिनांक 7 डिसेंबर, 1956 रोजी चैत्यभूमीवरच 25 लाख अनुयायांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने बौद्ध धर्माची दीक्षा भदंत आनंद कौशल्यन यांनी त्रिशरण पंचशीलाच्या उच्चाराने दिली.
1957 च्या सार्वजनिक निवडणुकीत शेकाफ हे पक्षाला चांगले यश मिळाले त्यात 21 आमदार आणि 11 खासदार निवडून आले.
दिनांक 3 ऑक्टोबर 1957 रोजी पक्ष स्थापन करण्यासाठी देशाच्या विभागातून नेते कडे नागपूरला एकत्र आले होते. त्याच दिवशी या पक्षाची स्थापना झाली. अध्यक्ष रावबहाद्दूर एन शिवराज, जनरल सेक्रेटरी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व सदस्य दादासाहेब गायकवाड, बी सी कांबळे इत्यादी होते.
खासदार बी.सी कांबळे यांनी 14 मे, 1959 रोजी नागपूर येथे पक्षाचे अधिवेशन भरवले आणि तेथेच त्या दिवशी आपला दुरुस्त गट स्थापन केला व त्याला दुरुस्त रिपब्लिकन पक्ष कांबळे गट म्हणण्यात येऊ लागले.
6 डिसेंबर, 1964 ला देशव्यापी भूमीहीनांचा सत्याग्रह कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. हा सत्याग्रह एवढा प्रचंड होता की दोन महिन्यात संबंध भारतातून तीन लाख 40 हजार सत्याग्रही तुरुंगात गेले त्यात सर्व जाती-जमातींची भूमिहीन शेतकरी होते.
दादासाहेब गायकवाड पंधरा वर्षे खासदार होते आपल्या भाषणातून त्यांनी पार्लमेंट गाजवली होती. 29 डिसेंबर, 1971 चा तो काळा दिवस ठरला त्याच दिवशी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जगाचा निरोप घेतला.
यांच्या कार्यास आणी त्यागास विनम्र अभिवादन..!💐🙏


0 comments: