जर आपला विरोध रक्षाबंधन ला असेल तर मग मंगळसूत्र, जोडवे, फेरवे, बांगड्या,नथनी, झुमके,बुरखे, पडदा, टिकल्या, पुरुषांचे गंडे, दोरे, जानवे, करगोटे, शेंड्या, टाकल्या, टोप्या, फेटे, झेंडे, नाव ,आडनाव, मंत्र, जप,तप, आराधना, नमाजी, वंदना, जात,धर्म, या गोष्टींना देखील आपला विरोध आहे का..?
प्रत्येक गोष्ट चिकित्सक बुद्धीने व विज्ञानाच्या कसोटीवरच आपण स्वीकारतोय का? येथील समाजमन प्रबोधन, टीका अन चिकित्सा समजून घेण्याइतक्या मानसिक प्रगल्भ अवस्थेत आहे का?
आईने अथवा ताईनेच का जेवण तयार करावं...? बापानी, मुलांनी पुरुषांनी पण एखादी भाजी, भाकरी पोळी अथवा भात तरी करावा ना?
भावानेच का मित्रांसोबत फिरायला जाव..दिवस रात्र मुलानेच का हुंदडावे?
त्यालाच का फिरण्याचे व मित्र-मैत्रिणी ठेवण्याचे स्वातंत्र्य?
तिने सुद्धा जाव की मित्र-मैत्रिणी सोबत.. फिरायला ?
तु समजुन घे. तुला लोकांच्या घरी जायचं आहे.. तु अशी रहा अन तू तशी रहा...सगळे नियम अन संस्कृती तिलाच का?
मग त्याने का नको समजुन घ्यायला? तिला ८-१० हजराचा मोबाइल आणी त्याला २०-५० हजाराचा चा मोबाईल हे चालतं का आपल्याला ? ती हुशार असुन D.Ed ला तो ढ असुन पैसे भरून इंजिनियरींग ला...का..?
आपला विरोध कुणाला? रक्षाबंधनला, हिंदू संस्कृतीला, अंधश्रद्धेला, हिंदुत्वाच्या राजकारणाला, अर्थकारणाला, समाजकारणाला, वर्णव्यवस्थेला, जातीयुक्त अर्थकारणाला..? की विरोधासाठी विरोध... विरोध करणे थांबवायचे की नाही? विरोध करून अन मन दुखवुन, कायदे अन क्रांत्या करता येतील. पण समाजाचं मन, विचार बदलण्यासाठी परिवर्तन घडवता येईल का? गावा-गावात घरा-घरात पोहचण्यासाठी बुद्धांचा प्रज्ञा, शील, आणि करुणा हा उपदेश अवलंबावा लागेल का?
आपण धर्म या संकल्पनेचे विरोधक आहोत की समर्थक? धर्माचा फायदा काय ? धर्म म्हणजे काय? त्याची गरज काय? महत्वाचे काय विज्ञान, मानवतावाद की धर्म?
सहिष्णुता, एकोपा, सर्वसमावेशकता कशी नांदेल मग? भारतीय लोक उत्सव प्रिय आहेत. असे सण मग साजरे करू नये का? ज्या सणात जात पात , अंधश्रद्धा अडवियेत नाही. (असे सण असतात का?) त्या प्रकारचे सण देखील राबवू नयेत का?
त्यात बहूसंख्य समाजाच्या संस्कृती, चालीरीती अन परंपरांची छाप इतर समाजावर कळत नकळत पडणारच...कधी-कधी तर फरफट अथवा द्विधा स्थिती होणार..
धर्म माणसाला श्रद्धा ठेवण्यास भाग पाडतात. अंधश्रद्धेचे मूळ हे श्रद्धा व धर्म आहेत. मग कुणाला डुक्कर निषिद्ध तर कुणाला गाय पवित्र...कुणी आंब्याची पान वापरणार तर कुणी पिंपळाची...कुणी नमाज पडणार, कुणी प्रार्थना करणार, तर कुणी त्रिसरण पंचशील म्हणणार...आमचे भिक्कु, तुमचे साधू आणि त्यांचे फादर अन मौलाना असणार..
लय कठीण हाय भाऊ..समता समानता राबवणं...तारेवरची कसरत अस्तिया...
माकडांच्या हाती कोलीत पडलं तर मग सगळीच वाट...स्वातंत्र्य लगेच स्वैराचार होऊन बसेल... बुद्धांनाही आपलं ज्ञान सामान्यांना सांगावं की नाही ही द्विधा अवस्था झाली होती. नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी दुसरं काय.?
क्रांत्या नका करू. परिवर्तन करा.. ते अधिक स्तिर , अहिंसक असतंय...
आपण विचार करण्यास प्रवृत्त व्हावं या दृष्टीने हे प्रयत्न...मी त्याविचारांचा समर्थक अथवा विरोधक असेनचं असं नाही. वेगवेगळी मत मांडावी ऐकावी त्यानं प्रगल्भता येते. कुणी काय स्वीकारावं आणि काय नाकाराव हा प्रत्येकाच्या सद्सत विवेक बुद्धीचा निर्णय असावा. कट्टरवादीविचारांचा, हिंसेचा मात्र आपण कायम विरोध करावयास हवा...
संस्कृती, रूढी, धर्म अन परंपरा या कायम बदलत राहतील. त्या काल्पनिक असतात अनेकदा.
भूमिका निर्णय बदलत राहतील काळानुरूप कारण उत्तम काय ते स्वीकारत जावं.
By the way this is the era of the technology and science...We need to talk about it. We need to talk socio-political-technical discourse .
Remember Nothing is the pemenant , Permenan is the *CHANGE*
0 comments: