Monday, 6 August 2018

पुरुषांच्या गावी*



पुरुष या शब्दातच तुम्हाला rouf पणा जाणवला असेल... तर ते संस्कार आपल्या मनावर समाजाने अन भाषेने जाणते-अजाणतेपणे केलेले आहेत.

विवाह करण्यासाठी तर पुरुष मुलगा हा त्या मुली पेक्षा कायम उजवाच असला हवा ?
तो अंगकाठीने तिच्याहुन उजवा हवा, शिक्षणाने, अन मुख्य म्हणजे आर्थिक रित्या मुलीहून सक्षम हवा आणि असं जर नसेल तर मग तो जोडा, जोडपं एकमेकाला अनुरूप नाहीत हा सढळ शेरा हमकास मारला जातो.

या पुरुष सत्ताक संस्कृतीने जस स्त्रियांचं कायम दमन आणि शोषण केलंय. त्याच प्रमाणे पुरुषाला पुरुषत्वाचा गोंडस ठेकेदार बनवून त्याला माणूस म्हणून नाकारलय. त्याला कायम जबाबदर्यांच्या ओझ्याखाली ठेवलंय. या जबाबदाऱ्या अनेकदा त्याची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणूक करणाऱ्या असतात. त्यात कहर म्हणजे त्यात त्याला व्यक्त होण्याचं, भावुक होण्याची जणू परवानगीच समाजाने नाकारली आहे.

भावना प्रधान पुरुष, अथवा हळवा पुरुष, सुख दुःखात रडणार पुरुष हा बायल्या असतो असे म्हणून त्याला डिवचणारे अनेक नकाबपोश लोक असतात.

दिखाऊ बडेजाव, पुरुषी अहंकार पोसण्याच्या नादात आणि आपल्याला कुणी बायल्या म्हणू नये व वेगळं पाडू नये या सामाजिक भीती आणि दडपणाखाली ते स्वतः च बेडकाचा बैल होण्यासाठी फुगत राहतात.

तो भाऊ असो, नवरा असो, नाहीतर बाप असो.... तो म्हणजे हक्काचा  security guard असतो.

अनेकदा त्याची हे सगळं सांभाळता-सांभाळता त्रेधा-तिरपिट उडते. संकटांत तो मानसिकरित्या खरंतर पोखरला जातो. बाहेरून दिसणारा पुरुष काठिण्यरुपी कंकाल बनतो. म्हणून शेतकरी, बिझनेसमन पुरुष आत्महत्त्या करतात; त्या प्रमाणात स्त्रिया नाही.
आत्महत्त्येचं प्रमुख कारण हे नैराश्य असतं...संकट नाही.

शरीरसबंधात तर त्यांची अशी हालत असते की मुक्याला बुक्यांचा मार...भारतात पुरुषांना sex वर्धक गोळ्या आणि टॉनिक खपाचे प्रमाण उगाच प्रचंड नाही. वर्तमान पत्र, रेल्वे स्टेशन आणि भिती-भिंतीवर नाहीतर इतक्या जाहिराती खप असल्याशिवाय आहेत काय?


आपला प्रवास हा मुला पेक्षा मुलगी बरी उजेड देते दोन्ही घरी.. असा असू नये...कारण त्यात पुन्हा तराजू मुलींचे उदात्तीकरण करण्याकडे झुकतो.
आपली घोषणा ही मुलगा-मुलगी एक समान दोघांनाही शिकवू छान अशी असावयास हवी.

धन्यवाद..!

0 comments: