१. भगवंतानी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी सर्व अर्हंत भिक्षुंना धम्मप्रचार प्रसारासाठी सारनाथ येथे आदेश दिला
जगद्वंदनीय जगद्गुरू तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्रप्रवर्तन केले आणि विशुद्धी मार्गाचा क्रमशः उपदेश सुरु केला. या उपदेशाला आषाढी पौर्णिमेपासून सुरुवात केली. प्रथम पांच परिव्राजक भिक्षु झाले. त्यानंतर पुन्हा पांच शिष्य मिळाले . यश , गवांपती , विमल ,सुबाहु आणि पूर्णजीत असे एकूण दहा शिष्य भगवंताला मिळाले . त्यानंतर पुन्हा वाराणसीच्या प्रदेशातून पन्नास तरुण भगवंताचे शिष्य झाले. एकूण साठ भिक्षुंचा संघ निर्माण झाला.
भगवान तथागतांच्या संघातील साठही भिक्षु अर्हंतपदाला गेले. भगवंतानी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी सर्व अर्हंत भिक्षुंना धम्मप्रचार प्रसारासाठी सारनाथ येथे आदेश दिला .
चरथ भिक्खवे चारिकं
बहुजन हिताय बहुजन सुखाय
लोकानुकम्पाय , अथाय , सुखाय
देवमनुसानं , देसेथ भिक्खवे
धम्मं आदिकल्याण मझ्जेकल्याण परीयोसन कल्याण
साथं संव्यजन , केवल परीपुणणं ब्रम्हचर्य पकासेथ !!
भिक्षुंनो , बहुजनांच्या हिताकरिता , बहुजनांच्या सुखाकरिता , लोकांवर अनुकंपा करावयाच्या भावनेने , स्वतःच्या तसेच सत्पुरुषांच्या हितासाठी आणि सुखासाठी भिक्षाटन करीत विचरण करा ! हा धम्म सुरुवातीला कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतिम कल्याणकारी असून अर्थ आणि भावाने परिपूर्ण आहे. अशा या धम्माचा ब्रम्हचर्यव्रत राखून प्रसार करा आणि त्याला पूर्ण प्रकाशित करा.
२. भगवान तथागतांनी अश्विन पौर्णिमेला वर्षावास समारोप केला.
बौद्ध धम्मात ह्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे .तेव्हापासून बौद्ध जगतात हा उत्सव साजरा केला जातो.
३. संघ दिवस
काही लोक ह्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात परंतु हि कोजागिरी पौर्णिमा नसून अश्विन पौर्णिमा आहे . आणि बौद्ध धम्मात ह्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे .
" सर्व बौद्ध उपासक / उपासिकांना अश्विन पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा "
जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
0 comments: