भारतीय संविधान

भाग एक
भारतीय संविधानाची मुळ हस्त लिखीत प्रत रामपूर येथील प्रेमबिहारी नारायण रायझाडा यांनी केले आहे. यासाठी वापरलेला पेपर हा मीनबॉर्न लोन पेपर आहे. त्याचा आकार १६.५ × ३०.५ इंच आहे. या कामासाठी ४०००/- रुपये खर्च आला. त्यानंतर या पानांवर अगदी मौर्य काळापासून ते स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास चित्रित केला. हे काम शांती निकेतन मधील नंदलाल बोस यांनी केलं. या कामास २१,०००/- रुपये खर्च आला. हे संविधान आताच्या लोकसभा सचिवालयात आहे.
भारतीय संविधान हे कायद्याचे पुस्तक आहे. आपण त्याला नागरिक शास्त्राचे पुस्तक म्हणूया . ज्या पुस्तकात आपल्या जीवनाशी संबंधीत हक्क,अधिकार व कर्तवांची कर्तव्यांची माहिती दिली आहे. स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय प्रदान करणारे पुस्तक होय.
२६ नोव्हेंबर, १९४९ रोजी हे संविधान लिहून पूर्ण झाले. ते लिहिण्यासाठी संविधान सभेला २ वर्ष, ११ महिने आणि १७ दिवस लागले आहेत. त्या भारतीय राज्यघटनेत मूळत एकूण २२ भाग होते. या बावीस भागात ३९५ कलमे आणि ८ अनुसूची होत्या.
नंतर, ९ अ नगरपालिका, ९ ब सहकारी संस्था आणि १४ अ न्यायाधिकरण असे तीन भाग फेरबदल म्हणून जोडले गेले, ज्यामुळे एकूण भाग संख्या २५ झाली. त्यामुळे भारतीय संविधानात आता २५ भाग ,४४८ कलमे, आणि १२ अनुसूची आहेत.
संविधान सभेची पहिली बैठक. दिनांक ९ डिसेंबर, १९४६ रोजी झाली. दिनांक २४ जानेवारी, १९५० रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानाच्या प्रतींवर सह्या केल्या. आणि संविधान सभेचे काम संपुष्टात आले. या कालावधीत ११ सत्र व १६५ बैठका संपन्न झाल्या. २२ नोव्हेंबर, १९४९ पर्यंत संविधानावर ६३,९६,७२९ रुपये खर्च झाला होता.
आजपर्यंत १०५ घटना दुरुस्त्या देखील झाल्या आहेत. लक्षात घ्या जरी कलमांची संख्या वाढली तरी एकूण कलम तुम्हाला ३९५ इतकेच दिसतील. हे लक्षात घेतले पाहिजे की भारतीय राज्यघटनेत कधीही नवीन कलम किंवा भाग जोडला जातो, तो वर्णक्रमानुसार केला जातो (उदाहरणार्थ, कलम 21 अ) जेणेकरून संविधानाच्या संरचनेत अडथळा येऊ नये.
संविधान समजून घेण्यासाठी आपण पुढील चार प्रकार प्रथम समजून घेऊ.
१. उद्देशिका Preamble
२. २५ भाग.
(या २५ भागात अनुच्छेद Article (३९५) आहेत)
३. अनुसूची Schedule (१२)
४. परिशिष्ट Appendix.
१. उद्देशिका Preamble
संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत सर्वश्रेष्ठ कायदा / त्याचे पुस्तक आहे. या संविधानातील उद्दिष्टे, हेतू, कायद्यातील तरतुदी यांची थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे ही उद्देशीका / प्रस्तावना होय. त्यातील प्रत्येक शब्दाला सखोल अर्थ आहे. संविधानाच्या प्रस्तावनेलाच ‘संविधानाचे प्रास्ताविक’ , ‘संविधानाचा सरनामा’ , किंवा ‘संविधानाची उद्देशिका’ असे म्हणतात.
उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता या तीन मूल्यांची हमी दिली आहे. उद्देशिकेचा इतिहास व त्यातील मूल्य यावर विस्तृत लिहिता बोलता येईल.
२. संविधानातील भाग/ प्रकरण.
भारतीय संविधानाचे भाग (Parts):
भाग १ – सामान्य प्रावधान ०१-०४
भाग २ – नागरिकत्व ०५-११
भाग ३ – मूलभूत अधिकार १२-३५
भाग ४ – सामाजिक व आर्थिक न्याय
भाग ४अ – मूलभूत कर्तव्ये ३६-५१
भाग ५ – केंद्र सरकार ५२- १५१
भाग ६ – राज्य सरकार १५२-२३७
भाग ७ – स्थगित २३८
भाग ८ – राज्यांचे संबंध २३८-२४२
भाग ९ – पंचायती राज २४३
भाग ९अ – नगरपालिकांचे कायदेसंस्था ९ब- सहकारी संस्था
भाग १० – राज्यपाल २४४
भाग ११ – केंद्र व राज्य यांच्यातील संबंध २४५-२६३
भाग १२ – केंद्र शासित प्रदेश २६४-३००
भाग १३ – न्यायालयीन पुनरावलोकन ३०१-३०७
भाग १४ – न्याय व समानता ३०८-३२३
भाग १४ अ न्यायाधिकरण
भाग १५ – राजकीय पक्ष व निवडणुका ३२४-३२९
भाग १६ ते २४ – विशेष प्रावधान ३३०-३४२
भाग १७ भाषा ३४३-३५१
भाग १८ आणीबाणी विषयक ३५२-३६०
भाग १९ मिश्र कलम ३६१-३६७
भाग २० संविधान दुरूस्थी ३६८
भाग २१ अनियमीत संक्रमण व विशेष तरतुदी ३६९-३९२
भाग २२ – संक्षिप्त रूपे,प्रारंभ आणि नीरसने ३९३-३९५
३. Schedules (अनुसूचियां):
भारतीय संविधानात Schedules (अनुसूचियां) खूप महत्वाच्या असतात. संविधानाच्या प्रारंभात विविध "Schedules" दिले आहेत, जे संविधानाचा अविभाज्य भाग मानले जातात.
संविधानाशी संबंधित प्रावधान: प्रत्येक Schedule मध्ये विशेष माहिती, अधिकार, कर्तव्ये किंवा विधेयकांचे (Acts) तपशील दिलेले असतात. उदाहरणार्थ, पहिली अनुसूची भारताच्या राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे नाम, राजधानी आणि सीमा यांचा तपशील देते.
४. Appendices (परिशिष्ट):
"Appendices" म्हणजे परिशिष्ट असतात, ज्यामध्ये मुख्यतः सहाय्यक किंवा अतिरिक्त माहिती दिली जाते. या माहितीचा संविधानाशी थेट संबंध नसतो, परंतु तो संबंधित कायद्याची अधिक स्पष्टता किंवा संदर्भ देण्यासाठी असतो.
विस्तारित माहिती: Appendices मुख्य दस्तऐवजाच्या भागात न समाविष्ट केलेली, परंतु त्याला सहायक असणारी माहिती असतात.
उदाहरण: एखाद्या कायद्याचे किंवा विधेयकाचे Appendices त्याच्या तपशीलवार सुसंगतीसाठी, उदाहरणार्थ इतर कायदे, तक्ते, दाखले इत्यादी समाविष्ट करतात.
फरक:
संविधानाच्या संदर्भात: Schedules हे संविधानाचा अविभाज्य भाग आहेत आणि संविधानाची कार्यप्रणाली किंवा समजण्यास मदत करतात, तर Appendices हे सहायक दस्तऐवज असतात, ज्यात अतिरिक्त माहिती किंवा स्पष्टीकरण दिले जाते, जे मुख्य दस्तऐवजाचा भाग नसून त्याला समर्थन करतात.

0 comments: