युरोपात असा एकही देश नाही की,जिथे बुद्ध धर्माचा प्रचार नाही. भगवान गौतम बुद्ध जगप्रसिद्ध युगपुरुष आहे.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
बौद्ध धर्माचा जन्म भारतात झाला. त्याचे प्रवर्तक गौतम बुद्ध ( इ.स.पू. - ५६३ इ.स.पू. ४८३) होते. जगातील जवळपास सर्व महाद्वीपात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. जगातील २० हुन अधिक देश बौद्धराष्ट्र व बौद्ध बहुसंख्य राष्ट्र आहेत. त्यापैकी लाओस, कम्बोडिया, भूटान, थाईलैण्ड, म्यानमार आणि श्रीलंका हे सहा देश "अधिकृत" 'बौद्धराष्ट्र' आहेत. कारण या देशांच्या घटनांमध्ये बौद्ध धर्माला 'राजधर्म' किंवा 'राष्ट्रधर्म' असा दर्जा आहे.असेही अनेक देश जगभरात आहेत जेथे ८०-९०% जनता ही बौद्ध धर्मीय आहे. यामध्ये चीन, जापान, वियतनाम, थाईलैंड, म्यान्मार, ताइवान, उत्तर कोरिया, कम्बोडिया ,हांगकांग, सिंगापुर , मंगोलिया इत्यादी देशांचा समावेश होतो.
जगातील सर्वाधिक उंच १० पुतळ्यांपैकी ७ पुतळे हे भगवान गौतम बुद्धांचे आहेत. स्प्रिंग टेंपल बुद्ध हेनान, चीन ५०२ फूट. लेक्युन सेक्या सॅग्ननिंग, म्यानमार ४२३फूट. म्यानमारमधील सर्वाधिक उंच पुतळा ३८१फूट. ग्रेट बुद्ध ॲंग थॉंन, थायलंड ३०२ फूट. ग्रॅंड बुद्ध जिंशू, चीन २८९फूट. लेशान जायंट बुद्ध लेशान, चीन २३३फूट. जगातील सर्वात उंच/मोठा दगडाचा पुतळा.थायलंड ५९.२ १९४फूट.
लेण्यांचे बौद्धधम्मात विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतात खडकांतून कोरलेली सुमारे १,२०० लेणी आहेत. त्यांतील हजाराहून थोडी जास्त लेणी महाराष्ट्रात आढळतात. त्यांत बौद्ध धर्मीयांच्या लेण्यांची संख्या सर्वाधिक आहे. धार्मिक प्रसार-प्रचार हाच प्रमुख हेतू सामान्यतः बहुतेक लेण्यांतून दिसून येतो. या लेण्यांचा सर्वसाधारण काळ इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. नववे शतक असा मानला जातो. भारतात मौर्यकालात प्रामुख्याने सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत (इ.स.पू. २७३-२३२) बौद्ध लेणी खोदण्यास प्रारंभ झाला असावा, असे त्या लेण्यांतील कोरी लेखांवरून ज्ञात झाले आहे. भारतात खोदलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध लेण्यांइतकी वैदिक वा हिंदू लेणी प्राचीन नाहीत. अफगाणिस्तानमधील बामियान येथे अनेक शैलगृहे असून, तेथे बुद्धाच्या भव्य मूर्ती आढळतात.
#Budha_Jayati
#२६में२०२१
0 comments: