Tuesday, 27 November 2018

आपलं विश्व( Universe )



विश्व (Universe) म्हणजे अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींच्या संकलन होय. ज्यामध्ये जिवंत वस्तू, ग्रह, तारे, आकाशगंगा, धूळ ढग, black hole, प्रकाश आणि अगदी वेळ देखील समाविष्ट आहे.

संपूर्ण विश्वाचा आकार आजतागायत मानवास अज्ञात आहे. संपूर्ण विश्व किती मोठे व विस्तारलेले आहे हे जाणून घेण्यास आपण आजतागायत असमर्थ ठरलो आहोत, म्हणून मानवाने संपूर्ण विश्वाचे दोन प्रकार केले आहेत. १.पाहुशकु (visible universe) असे विश्व आणि न पाहू शकलेले विश्व (non visible universe). आपण universe चा केवळ एक भाग पाहु शकतो त्यालाच आपण visible universe म्हणतो. आपली पृथ्वी, आकाशगंगा याच अवलोकनक्षम (visible universe) विश्वामध्ये मोडतात.

संपूर्ण विश्वाचा आकार अजूनही अज्ञात आहे, परंतु पाहण्यायोग्य (viable Universe) ब्रह्मांड मोजणे शक्य आहे.
या विश्वामध्ये (Universe) कोट्यवधी आकाशगंगा आहेत. प्रत्येक आकाशगंगेत लाखो किंवा कोट्यावधी तारे आहेत. तारे आणि आकाशगंगा दरम्यान  मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहे. ९०% जागा ही रिक्त आहे व १०% जागा ही ग्रह, तारे इत्यादींनी व्यापली आहे. संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती १३ बिलियन वर्षांपूर्वी झाली असावी. ही निर्मिती एका मोठ्या विस्फोटातून (big bang) निर्माण झाली आहे.

परंतु मला वाटते की मोठ्या धमक्या पूर्वी ( big bang) येथे काहीतरी असावे. कारण आपण सर्वच जाणतो कि उर्जा निर्माण केली जाऊ शकत नाही व नष्ट  होऊ शकत नाही. तिला एका स्वरूपात दुसर्या स्वरूपात बदलता येते.

विश्वाची व्याप्ती प्रचंड आहे ती मोजण्यासाठी आपण किलोमीटर वगैरे न वापरता प्रकाशवर्षं हे मापक वापरतो.
निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग १८६,२८२ मैल प्रति सेकंद (२९,७९२ किलोमीटर प्रति सेकंद) आहे आणि सिद्धांतानुसार काहीही प्रकाशापेक्षा अथवा प्रकाशा इतके वेगाने प्रवास करू शकत नाही. त्याचा वेग सुमारे ६७०,६१६,६२९ प्रति मैल आहे. जर आपण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करु शकलो तर आपण एका सेकंदात ७.५ वेळा पृथ्वीभोवती जाऊ शकतो.
सूर्यप्रकाश सरासरी सूर्यापासून ते पृथ्वीपर्यंत १५०,०००,००० किलोमीटर प्रवास  करून पृथ्वीपर्यंत ०८ मिनिटे आणि २० सेकंदानी पोहचतो. Visible universe चा व्यास ९३ बिलियन प्रकाश-वर्ष आहे.
त्रिज्या अंदाजे ४६.०५ अब्ज प्रकाश-वर्षांचा आहे.

तज्ञांच्या अंदाजानुसार, observable universe मध्ये १०० अब्ज ते २०० अब्ज आकाशगंगा असाव्यात. आपलं विश्व सतत प्रसरण पावत आहे. सुमारे ६७ किमी प्रति सेकंद या वेगाने त्याची प्रसारणाची क्रिया सुरू आहे. अर्थात universe सतत वाढत आहे त्याच्या कक्षा रुंदावत आहेत.






एक सुपरक्लस्टर लहान आकाशगंगा क्लस्टर किंवा गॅलेक्सी गटांचा एक मोठा समूह आहे; हे ब्रह्मांडच्या सर्वात प्रसिद्ध संरचनांपैकी एक आहे. आपणास माहित आहे की एक सुपरक्लस्टर एकत्रितपणे आकाशगंगांचा संग्रह आहे. पाहण्यायोग्य विश्वातील जवळपास १० दशलक्ष सुपरक्लस्टर आहेत.

मिल्की वे स्थानिक समूह ग्लेक्सी ग्रुपचा भाग आहे (ज्यामध्ये ५४ हून अधिक आकाशगंगा आहेत), जे बारीकाने लनेकेका सुपरक्लस्टरचा भाग आहे. हे सुपरक्लस्टर ५०० दशलक्ष प्रकाश-वर्षापेक्षा अधिक काळ पसरते तर स्थानिक समूह १० दशलक्ष प्रकाश-वर्षापेक्षा जास्त काळ पसरतो.

गॅलेक्सी हे गॅस, धूळ, कोट्यावधी तारे आणि त्यांचे सौर यंत्रणेचे प्रचंड संग्रह आहे. गुरुत्वाकर्षणाद्वारे एक आकाशगंगा एकत्र ठेवली जाते. आपली आकाशगंगा, दुधाळ आकाशगंगा (मिल्की वे) या नावाने ओळखली जाते.  दुधाळ आकाशगंगेच्या (Milky way)  मध्यभागी एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे. आपण पृथ्वीवर राहतो जी आपल्या सौर यंत्रणाचा भाग आहे. सूर्य हा आपल्या सौर यंत्रणेचा केंद बिंदू आहे.
आपली सौर यंत्रणा ही मिल्की वे गॅलेक्सीचा एक छोटासा भाग आहे.

(NOTE: so basically observable and non bservable are the two parts of univers. The observale universe divedes into 10 milions of super clusters. This super clusters contain local group of galaxies. These local group of galaxies contain near about 54 galaxies. Galaxies contain millions or billions of stars, together with gas and dust, held together by gravitational attraction.)

संविधान व कायदे.



प्रामुख्याने दोन प्रकारचे कायदे (LAW)आहेत.

१. CRIMINAL LAW आणि
 २.  CIVIL LAW
----------------------------------------------------------


१. CRIMINAL LAW:
भारतीय दंड संहिता (IPC) (फौजदारी कायदा), १८६०


लॉर्ड मेकॉले च्या काळात १९३४ ला या कमिशनचे स्थापना झाली.

IPC हा क्रिमिनल LAW आहे.
कोणता अपराध घडला तो कोणत्या section मध्ये येतो हे ठरते ती IPC व त्या अपराधाची किंवा गुन्ह्याची शिक्षा काय होऊ शकते,  ते भारतीय दंड संहिता (IPC)च  ठरवते.
(चोरी झाली की दरोडा ,की विश्वास घात हे IPC ठरवते जे SECTION लागू होईल त्यानुसार व त्यात त्या गुन्ह्याला दंड काय आहे हे पण IPC सांगते.)

code of criminal procedure (CRPC)
प्रक्रिया संहिता

IPC ने गुन्हा व शिक्षा ठरवते.मात्र CRPC  ही सर्व प्रक्रिया सांगते. उदा. अटक काशी होईल, पोलिसांचे काम, वकिलांचे काम, जज चे काम, बेल कशी मिळेल, कधी कोर्टात हजर करायचे ही सगळी प्रक्रिया CRPC ठरवते.

------------------------------------------------------
२. CIVIL LAW (नागरी संहिता)
Civil law मध्ये मुस्लिम law , hindu law व असे अनेक दिवाणी कायदे येतात.

CPC
यामध्ये घटस्पोट कसा होईल किती नुकसानभरपाई मिळेल. त्याची civil procedure code प्रक्रिया संगीतलेली आहे.
एखाद्याने contract तोडला तर नुकसानभरपाई काशी होईल ते सांगितले आहे.

या (civil law) कायद्यात नुकसानभरपाई मिळते. जेलची शिक्षा होत नाही.
-------------------------------------------------



संविधान

संविधान आणि IPC/CPC या थोड्या बहुत संबंधीत पण भिन्न-भिन्न बाबी आहेत.
१. संसदेत आणि विधान मंडळात लोकप्रतिनिधी कायदा करतात. परंतु तो कायदा जर संविधानातील अनुच्छेदच्या (Article) मर्यादे बाहेर जाणार नाही याची काळजी घेतात.

२. जर केलेला कायदा हा संविधानिक नसेल  Articles चे violation होत असेल तर न्यायालय केलेला कायदा रद्द करू शकतं.

३. कारण संविधान हे सर्वोच्च आहे. संविधानाला डावलून कुठलाही कायदा करता येत नाही. संविधान हे superior आहे.

४. संविधानात
मूलभूत हक्क, कर्तव्य (Fundamental Rights),  मार्गदर्शक तत्व,
कार्यकारी (Executive),
कायदेकारी(Legislative),
न्यायालयीन (Judicial),
संघराज्य प्रणाली
हे सर्व ठरवून दिले आहे.
संविधानात ARTICLES असतात. IPC मध्ये sections असतात.

६९ वा भारतीय संविधान दिवस .




सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

भारत देश हा अनेक भाषा, धर्म, वर्ण, वर्ग, वंश, वेष, केश, खान-पान, तापमान, आचार-विचार, मत भिन्नता असणारा तरीही एकसंध असलेला  विविधतेतून एकतेचा संदेश देणारा लोकशाही देश होय. या देशाचे संविधान या देशाला या एका माळेत गुंफण्याचे अतुलनीय महाकाय कार्य लिलया पेलून आहे. हा देश ज्या लोकशाहीवर उभा आहे. ती घटना म्हणजे "भारतीय संविधान" डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे निर्माते होय. २६ नोव्हेंबर , १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी,  १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ४४७ कलमे असून २ वर्ष ११ महिने १८ दिवस" एवढा कालावधी संविधान निर्मितीस खर्ची पडला आहे. भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

आदिम काळात ईश्वर हा सर्वोच्च होता. त्या नंतर धर्म हा सर्वोच्च बनला आणि आज संविधान या देशात सर्वोच्च आहे.

आपलं संविधान हे समता स्वतंत्रता, न्याय, आणि बंधुता या तत्वावर आधारित आहे.

आपण संविधान म्हटलं की भावनिक होणं एक मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण त्या भावनेच संविधान साक्षरता रुजवण्यात रूपांतर करणं अधिक महत्वाचे व गरजेचं आहे. संविधानिक मूल्यांना समजून उमजून घेऊन ती जनमानसात पोहचवण अधिक महत्वाचं आहे.

त्यासाठी तुम्ही दरवेळी झेंडे, मोर्चे काढणे, मोठनमोठाले लेख लिहले पाहिजेत असे नाही. संविधानिक साक्षरतेची सुरवात स्वतः पासून, स्वतःच्या घरापासून करा. हक्क आणि कर्तव्यं या दोन्ही बाबतीत जागृत रहा. अंधश्रद्धेला थारा देऊ नका. रहदारी, व्यवसाय, नोकरी येथे कायद्याच उल्लंघन करू नका. धार्मिक द्वेष पसरवू नका. स्त्री-पुरुष यांच्याशी समानतेन बंधुभावान वागा. कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडून तुमच्या Constitutional morality व ethics मोडू नका. इतकं केलं तरीही उत्तम..😊
-----------------------------------------------------------------

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)
☸1☸☸☸☸☸☸☸

…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.

…केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.

दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.

तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.

सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करुनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.

आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय. बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करुन देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरुन कळून येईल.

ब्राईसच्याच शब्दात मी उद्धृत करु इच्छितो, ती घटना अशी-

“काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करुन त्यात सर्व लोकांसाठी असेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, “हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे.” उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी ‘राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि “हे प्रभो, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे.” या शब्दांचा स्वीकार करण्यात आला.”

ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना ‘भारतीय लोक’ या शब्दाची चीड येत असे. भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.

…स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳