Saturday, 24 October 2020

परिवर्तन


पाथर पूजे हरि मिले , तो मैं पूजू पहाड़ . घर की चाकी कोई ना पूजे, जाको पीस खाए संसार... - कबीर

धर्म ही एक व्यक्तिगत अथवा वैयक्तिक बाब आहे; असे आपण कितीही जरी कितीही म्हटलं किंवा मानलं तरी ते आज मितीला साफ खोटं आहे. कारण, धर्म हा आर्थिक-सामाजिक-राजकीय व तत्सम बहुअंगी-बहुढंगी   

 गोष्टी व घडामोडींवर बहुआयामी परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. मुळात धर्म हा समाजाचेही सामाजिक जीवन जगण्याचे लिखित अथवा अलिखित नियमन आहे. म्हणून...

आपण नामस्मरण करतो, माळ जपतो, पूजा करतो, नमाज पडतो, मंदिर, मस्जिद, चर्च,विहार, गुरुद्वारा, किंवा इतर धार्मिक स्थळांना भेटी देतो, धार्मिक क्रिया करतो, सकाळी फोटो-मूर्तीला हार घालतो, नवस-सोहळे पाळतो,तीर्थाटन , उपवास करतो.. यातून आपण धर्माचे पालन करत असतो असे आपणाला वाटत असेल तर आपण चुकीच्या वाटेवर आहोत.

खरा धर्म हा सत्य, समाधी, समता, बंधुता,प्रज्ञा, करुणा आणि शिलाचे पालन यात आहे. काम,क्रोध, मोह, माया, मत्सर हा दुर्गुणांचा त्याग करण्यात आहे. जे मला किंवा तुम्हाला ही अवघड वाटते.

त्यामुळे माणसे बाह्य अवडंबर, कर्मकांड, गाजावाजा, अंगप्रदर्शन यावर भर देऊन स्वतः ला धार्मिक,आस्तिक व श्रेष्ठ सिद्ध करण्याचे प्रयत्न करत असतात. अनेक बुवा-बाबा अम्मा-टम्म, राजकीय पुढारी, धर्माचे ठेकेदार धर्माचा,धरणांचा व आपल्या भावनीक श्रद्धेचा गैरवापर करून आपलेच आर्थिक, सामाजिक, शारीरिक व राजकीय शोषण करत असतात.

धर्म ही धारण करण्याची गोष्ट आहे. तो रंग, वर्ण-वर्ग या बाह्यांगाशी संबंधित नाही. धर्म हा अंतर्मन, काया-वाचा, आचार-विचार व आत्मशुद्धीचा सम्यक समबुद्ध, प्रबुद्ध होण्याचा मार्ग आहे.

Thursday, 17 September 2020

आज विशेष

 


ते १९३३ या कालखंडात बौद्ध शिक्षा, बौद्ध संघ, विहार व अनेक दवाखाने निर्माण केले. १८ सप्टेंबर १८९३ साली शिकागो मध्ये संपन्न झालेल्या विश्वधर्म परिषदेत स्वामी वेवेकानंदांना भाषणाची संधी उपलब्ध करून देणारे #आनागारिक धम्मपाल.. 

जन्म १७ सप्टेंबर १८६४


द्रविड सांस्कृतिक भाषा, राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते व धर्मांधतेच्या मुर्त्या चौका-चौकात चपलीने बडवणारे महानायक #पेरियार ई. वी रामसामी

जन्म :१७ सप्टेंबर १८७९


ठाकरी शैली, प्रबोधनकार.. 

"दगलबाज शिवाजी", "देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे", "भिक्षुक्षाहीचे बंड" असे पुस्तक लेखक #केशव सीताराम ठाकरे....

जन्म : १७ सप्टेंबर १८८५


मार्क्सवादावर भारतीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारे प्रचविद्या पंडित, सैद्धांतिक मर्क्सवादाची मांडणी करणारे, वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद मांडणारे  #कॉम्रेड शरद पाटील..

जन्म: १७ सप्टेंबर १८७९


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा #यशवंतराव भिमराव आंबेडकर

 मृत्यू :१७ सप्टेंबर १९७७

Saturday, 29 August 2020

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक (धम्मग्रंथ) डॉ.आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने प्रथम १९५७ साली  प्रकाशित केली आहे. त्या वेळी सदर संस्थेचे अध्यक्ष न्या. आर.आर भोळे हे होते. खरंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी Buddha and His Dhamma या पुस्तकाला Buddha and His Gospel  असे नाव अगोदर दिले होते. बहुदा ते नाव त्यांनी नंतर बदलून Buddha and His Dhamma केले. बुद्धा अंड हीस गॉस्पेल या पुस्तकातील ऋणनिर्देशनात सविता आंबेडकर आणि डॉक्टर मालवणकर यांचे एक प्रकारे आभार मानले होते, परंतु सदर आभार मानण्याच्या मजकूर हा न्या. आर.आर भोळे यांना वगळून प्रिंट केला आहे. buddha and his gospel  मध्ये बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची करणे बाबासाहेबानी लिहिली होती परंतु नंतर ती वगळली .


 बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेले बुद्धा अंड हीस धम्मा एक प्रकारे संकलन केलेले पुस्तक आहे असे ते स्वतःच प्रस्तावनेत स्पष्ट करतात. बौद्धवाग्मयात आहे म्हणजे ते बुध्दांचेच तत्वज्ञान आहे असे मानण्यास बाबासाहेब तयार नव्हते . सदर तत्व मागाहून घुसडले असतील असे ते मानत उदा. चार आर्यसत्ये, बुद्धांच्या गृहत्यागाची करणे इत्यादी . 


 बाबासाहेबांनी अश्वघोष लिखित "बुद्ध चरित्र" या पुस्तकाचा आधार घेतला आहे त्याच प्रमाणे त्यांनी  महासच्चक सूक्त, निदान जातक, आणि धम्मपद यांचादेखील आधार घेतला आहे. 


रोहिणी नदीच्या वादाचा संदर्भ आपणास कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या अठराशे 1898 साल प्रकाशित झालेल्या "बुद्ध चरित्राचा" आधार घेऊ शकता. त्याचप्रमाणे धम्मचारी विमलकीर्ती यांचे "बाबांचे स्मरण" हे १९८३ सालचे  पुस्तक. त्याचप्रमाणे धर्मानंद कोसंबी यांचे "बुद्ध लीलासार संग्रह" १९४०व  सुत्तनिपात १९५५.


 राहुल सांकृत्यायन लिखित "बुद्धचर्या" १९९५ साली प्रसिद्ध झाले त्याचप्रमाणे" बुद्ध विचार" १९७३.बौद्ध वाग्मयातिल संदर्भासहित टिपणे  डॉ. आंबेडकर यांच्या Buddha and His धम्म ग्रंथाचा हिंदी अनुवाद भदन्त आनंद कौसल्यायन यांचे पुस्तक पाहू शकता जे १९६१ प्रसिद्ध झाले.