डॉ. राहुल सांस्कृत्यायन हे एकोणिसाव्या शतकातले एक प्रकांड पंडित! त्यांनी एकूण ४४००० पानांची १२५ पुस्तके लिहिली , अनुवादली व संपादित केली. संस्कृत बरोबरच इंग्लिश, फ्रेंच, रशियन भाषेचे ते एक गाढे अभ्यासक होते. याशिवाय जर्मन चिनी भाषेचा त्यांनी परिचय करून घेतला होता. पर्शियन, अरबी, तिबेटी, भाषा त्यांना उत्तम येत असत. हिंदीच्या ३३ स्थानिक उपभाषांचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. याखेरीज बंगाली, गुजराथी व मराठी भाषेतील ग्रंथ ते वाचू शकत. तामिळ व कानडी भाषेत ही त्यांना उत्तम गती होती. पाली भाषेतल्या बौद्ध ग्रंथांचे परिशीलन करून त्यांनी 'त्रिपिटकाचार्य' ही पदवी मिळवलेली होती. रशियातल्या लेनिनग्राद विश्वविद्यालयात संस्कृत आणि तिबेटी भाषांचे प्राध्यापक म्हणूनही २५ महिने काम केले. 'वोल्गा ते गंगा' या आपल्या ललित ग्रंथात त्यांनी ख्रिस्तपूर्व ६००० ते इसवी सन १९२२ पर्यंतच्या मानव समाजाच्या प्रगतीचे ऐतिहासिक, आर्थिक व राजकीय वस्तुस्थितीच्या आधारे चित्रण केले आहे.
#संदर्भ: राहुल संस्कृत्यायन, वोल्गा ते गंगा, लोकवाड्मय गृह, पुणे, अकरावी आवृत्ती जुलै २००८, पृष्ठ. क्र २०.
0 comments: