
तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रामुख्याने चार आर्य सत्य सांगितले.
१. जगात दुःख आहे.
२. दुःखाला कारण आहे.
३. दुःख निरोध तृष्णेच्या नाशातून दुःख निरोध करता येतो.
४. दुःख निरोधगामीमार्ग
दुःख निरोधगामी मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग.
१. सम्यक दृष्टी
२. सम्यक संकल्प
३. सम्यक वचन
४. सम्यक कर्म
५. सम्यक जीविका
६. सम्यक प्रयत्न
७. सम्यक स्मृती
८. सम्यक समाधी
गाडीच्या चाकाला बारा कड्या असतात तसे दुःखाला बारा निदाने,कारण वा हेतू असतात असे बुद्ध म्हणतात.
बौद्ध धर्मातील द्वादश निदान (१२ कड्या) म्हणजेच प्रतीत्यसमुत्पादाची साखळी पुढीलप्रमाणे आहे:
१. अविद्या (अज्ञान)
२. संस्कार – कर्म आणि मानसिक
३. विज्ञान – चेतना
४. नामरूप – शरीर आणि मन
५. षडायतन – सहा इंद्रिये
६. स्पर्श – इंद्रिय आणि विषय
७. वेदना – (आनंद, दुःख इत्यादी)
८. तृष्णा – इच्छा किंवा आसक्ती
९. उपादान – आसक्तीला ठेवणे हाव
१०. भव– (अस्तित्व)
११. जाति – जन्म
१२. जरामरण – वार्धक्य आणि मृत्यू
ही साखळी आहे. एका मेकावर ती अवलंबून असते. हे असले की ते होते. या कार्यकारणभावालाच बुद्ध प्रतीत्य (कारण) समुत्पाद (कार्य) म्हणतात. जर आपण अविद्या (अज्ञान) नष्ट केली, तर पुढचं सगळं साखळीतून आपोआप गळून पडतं – आणि त्यामुळे दुःखाची समाप्ती होते वा निर्वाणप्राप्ती होते!
बुद्ध सर्व वस्तुमात्र अनित्य वा क्षणिक असे मानतात. तेव्हा जे अनित्य वा क्षणिक नाही ते सत्य नाही असे ते सांगतात. म्हणून त्यांच्या तत्त्वज्ञानाला क्षणिकवाद किंवा अनित्यवाद असे देखील म्हणतात.
संदर्भ: बुद्ध भिक्खू आनंद विशाखा- शरद पाटील

0 comments: