Saturday, 17 March 2018

परिवर्तन

परिवर्तन

Related image
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या मुळ संघटना म्हणजे समता सैनिक दल , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा या तीन संघटना व तत्सम संकल्पना होय. त्यांना बळकट करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य करणे आहे असे मला वाटते. या देशात SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC nation पूर्णत्वास नेणे हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे असं मी मानतो.

२) हे करतांना प्रबुद्ध भारत निर्माण करणे, जातीसंस्थेचे समूळ उच्चाटन करणे व समता,न्याय,बंधुता आधारित संविधानिक राज्य प्रस्तापित करणे. ही उद्धिष्ट भारतीय समाजमनाने जोपासवयास हवीत.

३) आंबेडकरवाद हि वैश्विक, प्रगत, व कालानुरूप बदलणारी मानवतावादी, समानता, न्याय विचारसरणी आहे. धर्माच्या, जातीच्या कुंचल्यातून बाहेर पडून ती आपण पहिली पाहिजे सांगितली पाहिजे व समजून घेतली पाहिजे.

४) काही लाेक आंबेडकर वादी असल्याचा अनेक वर्षापासून कांगावा करित आहेत, किंबहुना ढोंग अथवा आव आणत आहेत.

काही नेते, लोक, आंबेडकरांच्या मुळ संघटनेस बळ न देता स्वतःची पोटभरी संघटन उभी करतात. बाबासाहेब व समाजाच्या नावावर स्वतःच्या पोळ्या भाजतात.अश्या लोकांना मी शत्रूहून अधिक वाईट असल्याचे समजतो.
अशा घरभेदी लोकांमुळे मूळ लढा विखुरला जातो.अगोदरच संख्येने कमी असलेला हा आंबेडकरी समाज या प्रतिक्रांत्यामूळे लहान-लहान संघटनेमध्ये तुटत जातो.

५) खर म्हणजे जे राजकीय पक्ष स्वयं घोषित आंबेडकरवादी आहेत ते खरंच जर आंबेडकरवादी असते तर काही समस्याच नहुती भले ते कितीही तुकड्यात का विखुरले असेनात, कारण बोट विखुरली तरी एकत्र आल्यावर त्याची वज्र मुठ होते परंतू दुर्दैव हे आहे की ते खरे आंबेडकरवादी नाहीत. ते असते  तर समतेसाठी, तत्वांच्या लढाईत समाजासाठी ते एका व्यासपीठावर आले असते परंतु तसे न होता ते भलत्याच विरोधी प्रतिगमी विचारसरणीची खुशामत करण्यात व्यस्त आहेत.

६) ज्या विचारसरणीचा अखंड आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला, ज्या मनुवादी असमानतावादी, धर्मांध शक्तींच्या छाताडात संविधान निर्मात्याने बुटाची लाथ हाणली त्याच घातक विचारसरणीच्या वळचणीला जर नेते जात असतील व सोबत समाजाची देखील फरपट करत असतील तर याहून द्रोह तो काय?

७) आपण (समानतातवादी समरसता वादी नाही)  अनेक पातळ्यांवर व संघटनांवर लहान मोठ्या रूपाने लढा देत असतो या सर्व आंबेडकरी व समकक्ष विचाराचे,संघटनांचे, व समाजाचे एक राजकीय संघटनेत एक न्याय सामाजिक लढ्यात रूपांतर व्हावयास हवे.

८) आज मितीला लोकशाहीला, संविधान न मानणारे, हिटलेरवादी, दंगलखोर, गुंड, चोर व दरोडेखोर देखील लोकशाही मार्गाने संसद भवनात जाऊन बसले आहेत. ते काय शासन, कायदे व निर्णय करत आहेत हे मी वेगळं सांगायची गरज नाही.

Educate agitate and organize.

0 comments: