भारताचा तालिबान तर होणार नाही ना???
मला सत्ता कुणाची आहे किंवा नाही याची चिंता नाही. सरकारी यंत्रणा बहुदा सर्वच राजकारण्या च्या हातातील बाहुले कधी नव्हते त्यामुळे तेही आमच्या अंगवळणी पडलेय.
मला चिंता वाटतेय ती सामान्य लोकांची मानसिकता कमालीची बदलतेय ते फक्त मतदार म्हणून पक्षासोबत न राहता ते fan झालेत त्या पक्षांचे आणि ही संख्या कमालीची चिंताजनक आहे .
माझं मत आहे तुम्ही खेळाडूचे fan व्हा कलाकाराचे fan व्हा राजकारण्यांचे फॅन नका बनू, कारण त्यानंतर तुम्ही आपसूकच भाट बनता.
सत्ता आणि स्पर्धा यामध्ये स्पर्धक नसतील तेव्हा विजेता एकच असतो. सत्ता निरंकुश बनते मग या स्पर्धेचे नियम हवे तसे बनवता येतात, वाकवता येतात व वेळ आली तर बदलता ही येतात.
सत्तेला जेंव्हा धर्माची पट्टी असेल तेंव्हा ते कट्टर वादाकडे वळतात व त्यांचे आंधळे समर्थक कोणत्याही थराला जातात, आणि हीच प्रकिया आहे तालिबान जन्माला घालण्याची. या प्रसुती वेदना ज्या भारतभूमी देतेय त्याने दुसरा तालिबान तर निपजनार नाही ना??
0 comments: