Friday, 22 June 2018

T.V पाहणं बंद कराव. का?





T.V चित्रपट आपल्याला मानसिक गुलाम तर बनवत नाहीत ना?
अंधश्रद्धा आणि कुसंस्काराची पेरणीसाठी तुमच्या घरातील TV तर जबाबदार नाही ना?

कारण साधारणता ९०% हुन अधिक हिंदी/मराठी सिरीयल विवाहबाह्य संबंधांवर बनवलेल्या असतात. त्यात भडक अंगप्रदर्शनाची फोडणी असतेच. प्रेक्षकांना हे आवडतं म्हणून नाही, तर प्रेक्षकांची चव बिघडावी म्हणून असतं हे सगळं. कळत न कळत विवाह बाह्य संबंधांना हवा देण्याचं अन असली भंपक संस्कृती संस्कार समाजात पेरण्याचं काम येथील (so called) उच्चभ्रू  मीडिया करत असतो.

थोतांडाचे राशिभविष्य, अन बिनकामाच्या राजकीय बातम्या ज्या सरकार, धर्म व त्यांच्या चमच्यांच्या पुरस्कृत असतात.

अंधश्रद्धांनी ओतप्रोत भरलेल्या पौराणिक काल्पनिक कथा आणि रुढींच वारेमाप उदात्तीकरण असतंं. इथला प्रेक्षक बिनडोक व्हावा, धार्मिक गुलाम व्हावा,  व कट्टरतावादाकडे वळावा. या व्यवस्थेचा मानसिक अंकित गुलाम बनून राहावा यासाठी इथला print आणि electronic मीडिया कार्यरत असतो.

इथला मीडिया धनदांडग्यांचा अन सत्तेचा बटीक झाला आहे. तो सामान्यांच्या समस्या दाखवत नाही. त्यांच्या समस्यांना वाचा फोडत नाही. त्यांची व्यथा मांडत नाही. दाखवलेच जर चेहरे तर ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचेच दाखवतात व सहानुभूती मिळवतात. अन्याय करणाऱ्यांचे, दलालांचे चेहरे हे कधीच दाखवत नाहीत. सरकार दरबारी न्यायासाठी लढत नाही. लोकशाहीचा हा खांब केव्हाच पोकळ झालाय.

HMT चे निर्मात्याची बातमी न दाखवता बाथटब मध्ये मारणाऱ्या नाटिसाठी दोन दिवस विधवा विलाप दाखवणारा हाच तो मीडिया..
.
परदेशी अक्षय कुमारला देशभक्त म्हणणारा.. अन त्याचे चित्रपट tax free करून राजकीय पोळी भाजणारे..सामान्यांच्या समस्या मांडणाऱ्या काला चित्रपट मात्र चित्रपटगृहातून काढून टाकतात.

सराफ, बेरडे, कुलकर्णी, जोशी, कदम, अन गणपती आणणारा भाऊ कदम अशी चित्रपट industry आहे. हे सामन्याचे चित्रपट कसे दाखवणार..
.
घडी-घडी दही हंडी, गणपती, दिवाळी सारखे सण चित्रपट मालिकांत दाखवणारे कधी आंबेडकर जयंती का दाखवत नाहीत हाही विचार केला पाहिजे.

0 comments: