एक तरुण म्हणून...
शिक्षणाचे, रोजगाराचे, व भविष्याचे अनेक प्रश्न सतत डोक्यात घोंघावत असतातच.
पाहिलेली स्वप्न अन त्यांचा उद्वस्त झालेला रंग....स्वतःलाच षंढ पणाची सतत जाणीव करून देत असतो. वेदनेची सुई काळजाला सतत कुरतडणारी असते, आणि हा ससेमिरा अखंड हातधूवून पाठीमागे असतो.
दुसऱ्याच क्षणाला स्वतःला सांभाळावे तर....
मिळालेल्या अनुभवाची ढाल करून तोल सावरत पुन्हा जीवनाच्या अपरिहार्यतेला सामोरे जाण्याची तयारी करावी लागते. जीवन व जीवनाची अपरिहार्यता रोज नवा संघर्ष उभा करते. अस्थिरता अन अपेक्षांच्या हिंदोळ्यावर दोलायमान अन गतिमान बेभरोशीे जीवनाचा तोल सावरण्याची कसरतच मुळी जीवघेणी व जीवनरुपी प्रवासाला अपघाती कलाटणी देणारीे ठरते.
.
पुन्हा कधी झालाच जर घाव पारोषा जखमांवरती तर त्यातून भळभळा वाहणारे रक्त तेवढे जखमांच्या जिवंत पणाची अखंड साक्ष देत असते.
संदिप के घायवट
Masst bhai👍
ReplyDelete