परिवर्तन
जयंतीला पैसे नाही दिले तर आंबेकरवादी नाही. कार्यक्रमाला पांढरे कापड घातली नाही तर आंबेडकरवादी नाही. जय भीम केला नाही तर आंबेडकरवादी नाही.
या सर्व आपापल्या सोइ प्रमाणे आंबेडकरवादाचा अर्थ लबाड लोकांनी घेतला व समाजाला पचनी पडला.
दारू ढोसणारे बरे आंबेडकरवादी असतात मग?
रस्त्यावर चाळे करणारे बरे आंबेडकरवादी असतात मग?
राजकारणात आंबेडकर विरोधी पक्षासमोर लाळ गाळणारे बरे आंबेडकरवादी असतात मग?
निवडणुकीत पैसे घेणारे बरे आंबेडकरवादी असतात मग?
आई वडिलांना अपमान करणारे बरे आंबेडकरवादी असतात मग?
अशी अनेक उदाहरणे देता येतील.....
लोकांनी आंबेकरवादाचा अर्थ आपल्या सोयीनुसार लावलाय हेच सत्य आहे.
आंबेडकरी विचारांचे पाईक होणे हे गळ्यात अथवा हातात १० व ५ रुपयाचे मुर्त्या अन शिक्के लटकवण्या इतकं सोपं नाही.
संदिप घायवट
0 comments: