Thursday, 30 August 2018

विचार..परिवर्तन..मध्यम मार्ग

विचार..परिवर्तन..मध्यम मार्ग





जर आपला विरोध रक्षाबंधन ला असेल तर मग मंगळसूत्र, जोडवे, फेरवे, बांगड्या,नथनी, झुमके,बुरखे, पडदा, टिकल्या, पुरुषांचे गंडे, दोरे, जानवे, करगोटे, शेंड्या, टाकल्या, टोप्या, फेटे, झेंडे, नाव ,आडनाव, मंत्र, जप,तप, आराधना, नमाजी, वंदना, जात,धर्म, या गोष्टींना देखील आपला विरोध आहे का..?

प्रत्येक गोष्ट चिकित्सक बुद्धीने व विज्ञानाच्या कसोटीवरच आपण स्वीकारतोय का? येथील समाजमन प्रबोधन, टीका अन चिकित्सा समजून घेण्याइतक्या मानसिक प्रगल्भ अवस्थेत आहे का?

आईने अथवा ताईनेच का जेवण तयार करावं...? बापानी, मुलांनी पुरुषांनी पण एखादी भाजी, भाकरी पोळी अथवा भात तरी  करावा ना?

भावानेच का मित्रांसोबत फिरायला जाव..दिवस रात्र मुलानेच का हुंदडावे?
त्यालाच का फिरण्याचे व मित्र-मैत्रिणी ठेवण्याचे स्वातंत्र्य?

तिने सुद्धा जाव की मित्र-मैत्रिणी सोबत.. फिरायला ?
तु समजुन घे. तुला लोकांच्या घरी जायचं आहे.. तु अशी रहा अन तू तशी रहा...सगळे नियम अन संस्कृती तिलाच का?

मग त्याने का नको समजुन घ्यायला? तिला ८-१० हजराचा मोबाइल आणी त्याला २०-५० हजाराचा चा मोबाईल हे चालतं का आपल्याला ? ती हुशार असुन D.Ed ला तो ढ असुन पैसे भरून इंजिनियरींग ला...का..?

आपला विरोध कुणाला? रक्षाबंधनला, हिंदू संस्कृतीला, अंधश्रद्धेला, हिंदुत्वाच्या राजकारणाला, अर्थकारणाला,  समाजकारणाला, वर्णव्यवस्थेला, जातीयुक्त अर्थकारणाला..?  की विरोधासाठी विरोध... विरोध करणे थांबवायचे की नाही? विरोध करून अन मन दुखवुन, कायदे अन क्रांत्या करता येतील. पण समाजाचं मन, विचार बदलण्यासाठी परिवर्तन घडवता येईल का? गावा-गावात घरा-घरात पोहचण्यासाठी बुद्धांचा प्रज्ञा, शील, आणि करुणा हा उपदेश अवलंबावा लागेल का?
आपण धर्म या संकल्पनेचे विरोधक आहोत की समर्थक? धर्माचा फायदा काय ? धर्म म्हणजे काय? त्याची गरज काय? महत्वाचे काय विज्ञान, मानवतावाद की धर्म?


 सहिष्णुता, एकोपा, सर्वसमावेशकता कशी नांदेल मग? भारतीय लोक उत्सव प्रिय आहेत. असे सण मग साजरे करू नये का? ज्या सणात जात पात , अंधश्रद्धा अडवियेत नाही. (असे सण असतात का?) त्या प्रकारचे सण देखील राबवू नयेत का?

त्यात बहूसंख्य समाजाच्या संस्कृती, चालीरीती अन परंपरांची छाप इतर समाजावर कळत नकळत पडणारच...कधी-कधी तर फरफट अथवा द्विधा स्थिती होणार..

धर्म माणसाला श्रद्धा ठेवण्यास भाग पाडतात. अंधश्रद्धेचे मूळ हे  श्रद्धा व धर्म आहेत. मग कुणाला डुक्कर निषिद्ध तर कुणाला गाय पवित्र...कुणी आंब्याची पान वापरणार तर कुणी पिंपळाची...कुणी नमाज पडणार, कुणी प्रार्थना करणार, तर कुणी त्रिसरण पंचशील म्हणणार...आमचे भिक्कु, तुमचे साधू आणि त्यांचे फादर अन मौलाना असणार..


लय कठीण हाय भाऊ..समता समानता राबवणं...तारेवरची कसरत अस्तिया...

माकडांच्या हाती कोलीत पडलं तर मग सगळीच वाट...स्वातंत्र्य लगेच स्वैराचार होऊन बसेल... बुद्धांनाही आपलं ज्ञान सामान्यांना सांगावं की नाही ही द्विधा अवस्था झाली होती. नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी दुसरं काय.?

क्रांत्या नका करू. परिवर्तन करा.. ते अधिक स्तिर , अहिंसक असतंय...

आपण विचार करण्यास प्रवृत्त व्हावं या दृष्टीने हे प्रयत्न...मी त्याविचारांचा समर्थक अथवा विरोधक असेनचं असं नाही. वेगवेगळी मत मांडावी ऐकावी त्यानं प्रगल्भता येते. कुणी काय स्वीकारावं आणि काय नाकाराव हा प्रत्येकाच्या सद्सत विवेक बुद्धीचा निर्णय असावा. कट्टरवादीविचारांचा, हिंसेचा मात्र आपण कायम विरोध करावयास हवा...
संस्कृती, रूढी, धर्म अन परंपरा या कायम बदलत राहतील. त्या काल्पनिक असतात अनेकदा.

भूमिका निर्णय बदलत राहतील काळानुरूप कारण उत्तम काय ते स्वीकारत जावं.

By the way this is the era of the technology and science...We need to talk about it. We need to talk socio-political-technical discourse .

Remember Nothing is the pemenant , Permenan is the *CHANGE*

Thursday, 16 August 2018

प्रेमळ गॅलरी...आठवणींची

प्रेमळ गॅलरी...आठवणींची
प्रेमळ गॅलरी...आठवणींची


काल फोनची रिंगटोन वाजली अन काळजात धस्स झालं...

बेडरूम मधुन हॉल पर्यंत धावतच आलो...फोन आणि माझ्यातल अंतर मला अतिशय वेगानं कापायचं होत. त्याच थोड्याशा वेळात मनाचा कालवा झाला होता अन मी फोनजवळ पोहचण्याआधीच एव्हाना माझं मन सुसाट वेगाने मोबाइल पर्यंत पोहचंल होत.

डिस्प्ले स्क्रिन वर My Jaan नाव दिसलं.. क्षणभर थबकलो....दुःख, आनंद, उत्साह, राग, प्रेम सगळं काही कसं एकदाच दाटून आलं होतं...पण तो फोन कधीही न येण्यासाठीचा आला होता...तशी पूर्व कल्पना आली होतीच मला...मला तो कॉल मिस नहूता करायचा...खरं म्हणजे मला तर तिलाही मिस नव्हतं करायचं पण...? सगळं काही आपल्या हातात नसतं.. Destiny की काय म्हणतात त्याला...असं ती म्हणायची.

चार्जिंगचं वायर काढलं आणि मोबाईल मी कानाला टेकवला. एव्हाना माझा जीव एका कानामध्ये एकवटला होता. मला साठवून ठेवायचं होतं..ते सगळं काही...पुन्हा कधीतरी एकांतात कुरवाळण्यासाठी....दुसरा काय पर्याय असतो..?

आवाज तोच पण आज त्याला धार होती. लग्न ठरलंय माझं...माझ्या कानात शिसव ओतलं...हे अपेक्षित असूनही...डोळ्यापुढे क्षणभर अंधार झाला...मी सावरलं स्वतःला अन बाजूच्या सोफ्याचा आधारघेत भिंतीला टेकून फरशीवर बसता झालो.

माहितीये लग्न ठरलंय तुझं. मी अभिनंदन नाही केलं मला ते षंढ झाल्यासारखं वाटलं असतं. त्यानंतरचे शब्द फक्त माझ्या कानावर आदळत होते. पण मला काही पुढे ऐकू आले नाही...काही आठवत ही नाही... पुरुष रडतात की नाही मला माहित नाही..पण मी तो मार्ग पत्करला होता...

आता फोन नावाला कानाला होता...डोळे नुसतेच वाहत होते. डोळ्यांपुढून सगळी चलचित्र सरकत होती.


माझा मोबाइल नंबर तिने केव्हाच डिलीट केला होता..आठवणींची गॅलरी तिने खाली केली होती. तिच्या मनावरचं माझं साम्राज्य नाकारलं होतं.

जवळ येतांना कवेत घेतांना जातीची उतरंड आणि अस्पृश्यता कधी आड आली नहूती...पण लग्न.... ?दोन समाजात होत असत आणि इथंच घोड आडल होत.

खरंच असं सगळंकाही क्लिअर करतायेत का? ज्यावर प्रेमकेलं त्याची भीती तिला वाटतं असेल का..? तिला हे सगळं विसरून नवीन आयुष्य जगायचं होतं. खरंच असा भूतकाळ तोडून नवीन होता येत का?
तिच्या भविष्यात मला कुठेच जागा नसेल. एव्हाना तिच्या भुतकाळातूनही ती मला क्लिअर करत होती. सिक्युअर लाईफ, उज्जवल भविष्य, सुखांचा बाजार हवा होता तिला त्याच प्रेमात ती माझं प्रेम विसरली असावी..?

सोडून चालली याचा मुळीच राग नाही आला. माझा विश्वास तोडला त्याचा राग आला. माझंच प्रेम कुठेतरी कमी पडलं याचा मनस्वी खूप तिरस्कार केला मी स्वतः चा....

मी तुला कधीच त्रास देणार नाही. इच्छा झाली तरी msg , call करणार नाही. तू मला हवी होतीस हाच माझा स्वार्थ होता. तुला त्रास देण्याइतका मी कधीच स्वार्थी नहूतो.

फक्त तुझ्या आठवणीनं कळ आली काळजात...


टीप :  शब्द माझे भावना तुमच्या..

Monday, 6 August 2018

पुरुषांच्या गावी*

पुरुषांच्या गावी*


पुरुष या शब्दातच तुम्हाला rouf पणा जाणवला असेल... तर ते संस्कार आपल्या मनावर समाजाने अन भाषेने जाणते-अजाणतेपणे केलेले आहेत.

विवाह करण्यासाठी तर पुरुष मुलगा हा त्या मुली पेक्षा कायम उजवाच असला हवा ?
तो अंगकाठीने तिच्याहुन उजवा हवा, शिक्षणाने, अन मुख्य म्हणजे आर्थिक रित्या मुलीहून सक्षम हवा आणि असं जर नसेल तर मग तो जोडा, जोडपं एकमेकाला अनुरूप नाहीत हा सढळ शेरा हमकास मारला जातो.

या पुरुष सत्ताक संस्कृतीने जस स्त्रियांचं कायम दमन आणि शोषण केलंय. त्याच प्रमाणे पुरुषाला पुरुषत्वाचा गोंडस ठेकेदार बनवून त्याला माणूस म्हणून नाकारलय. त्याला कायम जबाबदर्यांच्या ओझ्याखाली ठेवलंय. या जबाबदाऱ्या अनेकदा त्याची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणूक करणाऱ्या असतात. त्यात कहर म्हणजे त्यात त्याला व्यक्त होण्याचं, भावुक होण्याची जणू परवानगीच समाजाने नाकारली आहे.

भावना प्रधान पुरुष, अथवा हळवा पुरुष, सुख दुःखात रडणार पुरुष हा बायल्या असतो असे म्हणून त्याला डिवचणारे अनेक नकाबपोश लोक असतात.

दिखाऊ बडेजाव, पुरुषी अहंकार पोसण्याच्या नादात आणि आपल्याला कुणी बायल्या म्हणू नये व वेगळं पाडू नये या सामाजिक भीती आणि दडपणाखाली ते स्वतः च बेडकाचा बैल होण्यासाठी फुगत राहतात.

तो भाऊ असो, नवरा असो, नाहीतर बाप असो.... तो म्हणजे हक्काचा  security guard असतो.

अनेकदा त्याची हे सगळं सांभाळता-सांभाळता त्रेधा-तिरपिट उडते. संकटांत तो मानसिकरित्या खरंतर पोखरला जातो. बाहेरून दिसणारा पुरुष काठिण्यरुपी कंकाल बनतो. म्हणून शेतकरी, बिझनेसमन पुरुष आत्महत्त्या करतात; त्या प्रमाणात स्त्रिया नाही.
आत्महत्त्येचं प्रमुख कारण हे नैराश्य असतं...संकट नाही.

शरीरसबंधात तर त्यांची अशी हालत असते की मुक्याला बुक्यांचा मार...भारतात पुरुषांना sex वर्धक गोळ्या आणि टॉनिक खपाचे प्रमाण उगाच प्रचंड नाही. वर्तमान पत्र, रेल्वे स्टेशन आणि भिती-भिंतीवर नाहीतर इतक्या जाहिराती खप असल्याशिवाय आहेत काय?


आपला प्रवास हा मुला पेक्षा मुलगी बरी उजेड देते दोन्ही घरी.. असा असू नये...कारण त्यात पुन्हा तराजू मुलींचे उदात्तीकरण करण्याकडे झुकतो.
आपली घोषणा ही मुलगा-मुलगी एक समान दोघांनाही शिकवू छान अशी असावयास हवी.

धन्यवाद..!