१४ ऑक्टोबर, १९५६ या दिनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली. त्या क्रांतिकारी,अभूतपूर्व व ऐतिहासिक घटनेला आज ६७ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ६७ वर्षात आपण काय केले याचा हिशोब, पडताळणी व सिंहवलोकल करावयास हवे.
मी तीन मुद्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो:
🔵 एक
अस्पृश्य समाजातील अनेकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दीक्षे नंतर त्यांच्या जीवनमानात क्रांतिकारी व अमुलाग्र सकारात्मक बदल झाले. जगाच्याच्या इतिहासात इतक्या अल्पावधीत व इतक्या प्रचंड वेगाने कुठल्याही समाजाने प्रगती केलेली नाही. अशी प्रगती या समाजाने केली. हा बदल बाबासाहेबांच्या आणि बुद्ध धम्माच्या विचारांची कास धरल्यामुळे, शिक्षणामुळे, खुळचट धर्मकल्पना व अंधश्रद्धा नाकारल्यामुळे त्यासोबत मिळालेल्या संविधानिक अधिकारामुळे झाला आहे.
असे असले तरी सारेच काही आलबेल आहे असे नाही. हा धम्मरथ भारत बौद्धमय करण्याच्या दिशेने अपेक्षित वेगाने पुढे सरकताना दिसत नाही.
त्याला कारण आपल्या शेजारी असणारे मांग व चर्मकार बंधूंना देखील आपण बौद्ध धम्म दीक्षा देऊ शकलो नाही.
🔵 दोन
स्वतःस पुरोगामी आणि आंबेडकरवादी अशी दुहेरी ओळख असणाऱ्यांनी देखील बुद्ध धम्माला अस्पृश्य ठरवून जाणीवपूर्वक बुद्धधम्माला बगल दिली आहे. बुद्धांचे तत्वज्ञान आम्ही मानतो. स्वीकारतो परंतु धम्म स्वीकारण्याची हिंमत व धमक नसणाऱ्यांमुळे देखील धम्मारथ अडकला आहे. मुळात आंबेकरवाद अथवा आंबेडकरवादी होण्यासाठी तुम्हाला धम्माचे तत्वज्ञान हे स्वीकारणे अनिर्वार्य आहे. कारण बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्राचे सार हे धम्माधारीत आहे.
सेलेक्टिव्ह आंबेडकर स्वीकारणे हे पळपुटे पणाचे व समाजाच्या करंटेपणाचे लक्षण आहे. आंबेकरवाद हा धम्म दीक्षेविना पूर्ण होऊच शकत नाही. आंबेकरवादाचे सर्वोत्तम व सर्वोच्च टोक हे बाबासाहेबांची धम्मदीक्षा आहे. दस्तुरखुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातील लढाई ही श्रमणवाद विरुद्ध ब्राम्हणवादी अशीच आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून असणारे (पुरोगामी + आंबेडकरवादी) हे धर्मांतराच्या रथाला खीळ घालणारे लोक आहेत असे मी मानतो.
🔵 तीन
आता ज्यांनी धम्म स्वीकारला आहे. त्यांनी देखील आपल्या चालण्या बोलण्या व वागणुकीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे.
१४ जानेवारी,१९५१ रोजी वरळी बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्याख्यान झाले. त्यात ते म्हणाले की, "बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी काही नियम करणार आहे. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धम्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही." शिवाय, ज्या हिंदूंना धम्मदीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दृष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात आणि बुद्ध धम्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात, अशांना बुद्ध धम्मात येता येणार नाही. ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे, बुद्ध धम्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाहीतर बाराभाईची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धम्मच पाळा इतर काही नाही."
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
जय✺भीम.
नमो✺बुद्धाय
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
0 comments: