जीवनात केलेल्या संघर्षामुळे बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून घेतले होते. त्यामुळे ते सर्व त्रास विसरून उच्चतम शिक्षण घेण्यात व्यस्त राहिले. त्यांना जेवण मिळो की न मिळो, पण पुस्तके मिळाली पाहिजेत असे त्यांचे धोरण होते. जेवणाच्या पैशातून ते पुस्तके विकत घेत होते. त्यांच्या ग्रंथालयात सर्व विषयांचे हजारो ग्रंथ होते. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथसुद्धा होते. हे ग्रंथ त्यांनी अनेक देशांतून विकत घेतले होते.
ज्याप्रमाणे मला शिक्षण मिळाले त्याप्रमाणे इतरांनाही मिळाले पाहिजे हा विचार करून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेने मुंबईमध्ये जून १९४६ साली सिद्धार्थ कॉलेज, ऑगस्ट १९५१ मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय सुरू केले. दलित समाजातील युवकांना उच्च शिक्षण करण्यासाठी डॉ.आंबेडकर सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविले होते. समाजात आज जी प्रगती दिसून येत आहे ती बाबासाहेबांनी शिक्षणावर भर दिल्यामुळेच झाली यात काही शंका नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिंचित केलेल्या ज्ञानवृक्षाचा विस्तार!
'सेव्ह पीईएस' मोहिमेच्या अंतर्गत, संस्थेच्या देशभरातील शाळा-महाविद्यालयांची त्यांच्या स्थापना वर्षासह संपूर्ण यादी आपल्या महितीस्तव देत आहोत :
🏢 मुंबई
सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई : १९४६
सिद्धार्थ नाईट हायस्कुल, मुंबई : १९४६
सिद्धार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई : १९५३
सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई : १९५६
डॉ. आंबेडकर वाणिज्य, अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा : १९५६
डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, वडाळा : १९७१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट : १९७८
लीगल रिसर्च सेंटर, वडाळा, मुंबई : १९९०
🏢 नवी मुंबई
पी.ई.एस. सेकंडरी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज : १९७८
पी.ई.एस. प्रायमरी मराठी शाळा : १९७८
पी.ई.एस. सेंट्रल स्कूल : १९७८
पी.ई.एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन : १९७८
🏢 छत्रपती संभाजीनगर
मिलिंद कला महाविद्यालय : १९५०
मिलिंद विज्ञान महाविद्यालय : १९५०
मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल : १९५५
मिलिंद प्री-प्रायमरी आणि प्रायमरी इंग्लिश स्कूल : १९५५
डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय : १९६३
मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, सिडको : १९६५
डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय : १९६८
पी.ई.एस. कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन : १९८४
पी.ई.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग : १९९४
पी.ई.एस. पॉलिटेक्निक : २०१०
🏢 पुणे
पी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, येरवडा : १९७८
डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, येरवडा : १९८५
🏢 महाड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महाड (रायगड) : १९६३
🏢 नांदेड
नागसेन हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज : १९८१
नागसेन विद्यालय प्राथमिक शाळा : १९८१
🏢 पंढरपूर
गौतम विद्यालय, पंढरपूर (सोलापूर) : १९७८
🏢 बँगलोर, कर्नाटक
पी.ई.एस. नागसेना विद्यालय, बँगलोर : १९८४
पी.ई.एस. बुद्धिस्ट सेमिनरी, बँगलोर : २००४
🏢 बोधगया, बिहार
डॉ. बी. आर. आंबेडकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, बोधगया : २००८
नालंदा शाखेने ०४ ऑक्टोबर, २०२६ रोजी या महाविद्यायाला भेट दिली तो क्षण.


0 comments: