Thursday, 25 October 2018

धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा



भारतीय वंशाच्या राजाचे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे राज्य, मुघल साम्राज्य पेक्षाही १० लाख चौरस किलोमीटर मोठे असे असलेले साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय.  साम्राज्य ५० लाख चौ.किमी पसरलेले होते.

सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या दीक्षेनंतर शांती व अहिंसेने बांधून ठेवले होते. हे खरे आहे की सम्राट अशोकाने सीमेवरील सैनिक खालसा केले नाही.. कारण अहिंसा म्हणजे आत्मघात नव्हे. मात्र कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाच्या काळात युद्ध झाले नाही.

भारतीय मातीतील तत्त्वज्ञान,विद्या, योग, व धम्म  जगात पोहचवण्याचे काम सम्राट अशोकाने केले. नालंदा, तक्षशिला सारखी विश्वविद्यालय त्याने निर्माण केली. त्याने ८४ हजार स्तूप जंबुद्विपावर बांधले.

राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्र प्रवर्तनाचेच प्रतिक आहे!
भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे.
राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात‘धर्मचक्रप्रवर्तन’
असे कोरलेले आहे. आपल्या भारतीय चलनावरील सारनाथचे चार सिंह हे देखील चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या साम्राज्याची ओळख आहे.

भारताच्या इतिहासात एकच असा 'एकमेव'
 म्हणण्यासारखा कालखंड आहे, तो स्वातंत्र्याचा
 काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा सुवर्ण
 काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मोर्या
 सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.

ह्या भारतीय उपखंडात पहिले धम्मचक्र प्रवर्तन बुध्दाने  सारनाथ येथे केले.....

बुध्दाचे अनुयायी सम्राट अशोक ह्यांनी विजयादशमी या दिनी दुसरे धम्मचक्र प्रवर्तित केले .....

बाबासाहेबांनी ह्याच अशोक विजयादशमीदिन निवडुन तिसरे धम्मचक्र प्रवर्तित केले ......

बाबासाहेबांनी देखील अशोक विजयादशमीहा दिवस धम्मदिक्षेसाठी निवडला.
जगातील सर्वातमोठे अहिंसक मार्गाने केलेले धर्म परिवर्तन... इसवीसनाप्रमाणे ती तारीख १४/१०/१९५६ अर्थात अशोक विजायादशमी....

अशोक विजयादशमीच्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा

भवतु सब्ब मंगलम!!!

अस्सयुजो पुणमी (अश्विन पौर्णिमा)



१. भगवंतानी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी सर्व अर्हंत भिक्षुंना धम्मप्रचार प्रसारासाठी सारनाथ येथे आदेश दिला

जगद्वंदनीय जगद्गुरू तथागत भगवान बुद्धांनी  धम्मचक्रप्रवर्तन केले आणि विशुद्धी मार्गाचा क्रमशः उपदेश सुरु केला. या उपदेशाला आषाढी पौर्णिमेपासून सुरुवात केली. प्रथम पांच परिव्राजक भिक्षु झाले. त्यानंतर पुन्हा पांच शिष्य मिळाले . यश , गवांपती , विमल ,सुबाहु आणि पूर्णजीत असे एकूण दहा शिष्य भगवंताला मिळाले . त्यानंतर पुन्हा वाराणसीच्या प्रदेशातून पन्नास तरुण भगवंताचे शिष्य झाले. एकूण साठ भिक्षुंचा संघ निर्माण झाला.
भगवान तथागतांच्या संघातील साठही भिक्षु अर्हंतपदाला गेले. भगवंतानी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी सर्व अर्हंत भिक्षुंना धम्मप्रचार प्रसारासाठी सारनाथ येथे आदेश दिला .
चरथ भिक्खवे चारिकं
बहुजन हिताय बहुजन सुखाय
लोकानुकम्पाय , अथाय , सुखाय
देवमनुसानं , देसेथ भिक्खवे
धम्मं आदिकल्याण मझ्जेकल्याण परीयोसन कल्याण
साथं संव्यजन , केवल परीपुणणं ब्रम्हचर्य पकासेथ !!

भिक्षुंनो , बहुजनांच्या हिताकरिता , बहुजनांच्या सुखाकरिता , लोकांवर अनुकंपा करावयाच्या भावनेने , स्वतःच्या तसेच सत्पुरुषांच्या हितासाठी आणि सुखासाठी भिक्षाटन करीत विचरण करा ! हा धम्म सुरुवातीला कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतिम कल्याणकारी असून अर्थ आणि भावाने परिपूर्ण आहे. अशा या धम्माचा ब्रम्हचर्यव्रत राखून प्रसार करा आणि त्याला पूर्ण प्रकाशित करा.

२. भगवान तथागतांनी अश्विन पौर्णिमेला वर्षावास समारोप केला. 

बौद्ध धम्मात ह्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे .तेव्हापासून बौद्ध जगतात हा उत्सव साजरा केला जातो.

३. संघ दिवस

   काही लोक ह्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात परंतु हि कोजागिरी पौर्णिमा नसून अश्विन पौर्णिमा आहे . आणि बौद्ध धम्मात ह्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे .

" सर्व बौद्ध उपासक / उपासिकांना अश्विन पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा "

जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

सावध ऐका पुढल्या हाका..




इथला सो कॉल्ड मीडिया अथवा पुरोगामी दलितांचे मूळ प्रश्न कधीच मांडणार नाही. इथले विचारवंत आणि बुद्धिजीवी फक्त चकाचौन्द आणि  विचारांची झालर पांघरून तुम्हाला मोह जाळयात घेऊन स्वतः मोठे होतील. दोनचार दलितांच्या स्वार्थी नेत्या अन चाटु चमच्यांच भलं करतील. आणि पुरोगामी, समाजसेवक, समाजसुधारक असल्याचा गावभर आव आणतील स्वतः ची प्रतिमा प्रतिस्थापना करून मग NGO टाकून करोडो कमवतील. आशा मुखवटे धारी लोकांपासून दलितांनी सावध राहिले पाहिजे. अशा मुखवट्यांना आपण समर्थन देऊन मोठेतर करत नाहीत ना हे तपासलं पाहिजे.

पितळ, #तांबे, अन #सोन ओळखता यायला हवं व योग्य #दिशा स्वीकारायला हव्यात.  नाहीतर हरीहरी (कन्हैया) करत ##नरकेत जावं लागेल. #आठवलं म्हणून सांगतोय.

सो कॉल्ड सवर्ण हा हजारो वर्षापासून सत्ता संपत्ती ज्ञान याचा   पूर्ण लाभ, उपभोग घेतोय. त्याला मिळालेल्या अमर्याद संधीतून त्याने सगळीकडे सत्ता काबीज केली आहे. आज तो develop दिसतोय त्याचं कारण तो पिढ्यानपिढ्या याचा वापर करून संपन्न, तरबेज झालाय. आजही जल, जमीन, जंगल ही याच उच्चभ्रुनची मालकी आहे. दलितांकडे आरक्षण आणि संविधान या पलीकडे काहीही survival साठी आधार नाही. ते ही स्वातंत्र्यापासून आजतागायत अधिक धोक्यात येत आहे. ज्यांची पहिली अथवा दुसरी पिढी आता शिकतेय त्यांची स्पर्धा सर्व संपन्न सवर्ण समाजाशी होऊ शकत नाही. जिथे धर्मांधता, जातबंधु लॉबिंग, खोटे मेरिटधारी विद्वेषी असतील. Step by step evolution and revolution, delvelop नावाचा प्रकार असतो की नाही?

हा सवर्ण दोन्ही तिन्ही चारी बाजूच नेतृत्व आपल्याच हातात ठेवतो. ते समाजवादी, संघवादी, मार्क्सवादी, धर्मवादी, पुरोगामी , कला क्रीडा, ज्ञान राजकारण सगळीकडे यत्र तत्र सर्वत्र आपले नेतृवत उभे करत असतात. आंबेडकरवाद्यांमध्ये देखील हे घुसलेत... आंबेडकरवाद्यांनी दाई आणि माई यातला फरक वेळीच ओळखला पाहिजे.

आंबेडकरवाद्यांनी धार्मिक, वैचारिक, राजकीय प्रतिक्रांती पासून अर्थात सवरणांच्या मुखवट्या पासून आणि आपल्यातील चाटुगिरांपासून सावधान राहिले पाहिजे.

आंबेडकारवादी विचारधारेला धोका या पांचट, गुळचट, बोटचेप्या, घरभेदया,आळशी, घरकोख्या, सोंगाड्या, दिखावू धम्म आचरण, आंबेडकरवादी मुखवट्यापासून देखील आहे.

आंबेडकर व गांधी दोन वेगवेगळ्या विचारधारा ? भाग -०२



भाग -०२

श्रमविभागणी वर आधारलेली चातुर्वर्ण्याची पद्धती ही आदर्श समाज व्यवस्था होती असे गांधीजी मानीत असत. आवर्ण किंवा पंचम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्पृश्यांची गणना क्षुद्र या चौथ्या वर्णामध्ये करणे योग्य होईल असे त्यांना वाटत असे. मूळच्या चार वर्णांचे तुकडे पडून चार हजार जाती झाल्या कारण जात धर्म धिष्टित असते, तर वर्ण गुण आणि कर्मावरून ठरतो. चार वर्गांच्या व्यवस्थेमध्ये विषमता नाही, तर समानता आहे. कारण ही चारी वर्ण ही एकाच विश्वव्यापी पुरुषाच्या देहाचे चार अविभाज्य आहेत असाही ऋग्वेदातील पुरुष सुक्तातील ऋचेचा गांधीजी अर्थ लावीत असत. चतुवर्णचे पुरस्कर्ते भगवत्यागीतेतील चौथ्या गुणकर्म विभागनी: हे श्रीकृष्णाचे वचन नेहमी ते उधृत करीत असत. 【संदर्भ संदर्भ एम.के गांधी भगवद्गीता १९८० पृष्ठ क्रमांक १२३, १२४】

गीता म्हणजे अमृत, त्यातील श्लोक म्हणजे प्राणवायु, गीता म्हणजे कल्पवृक्ष तिची श्रद्धापूर्वक पठण व मनन करावे असे गांधीजी सांगत असत.

गांधीजींच्या मते आपल्या काळात खऱ्या अर्थाने वर्ण आढळत नाहीत. वर्ण म्हणजे सहभोजन वरील आणि आंतरजातीय विवाह वरील निर्बंध एवढाच त्यांचा मर्यादित अर्थ उरलेला आहे. वर्ण म्हणजे कार्याची विभागणी. त्यामुळे वर्णव्यवस्था ही केवळ हिंदू धर्म पुरती मर्यादित नसून ती जगात सर्वत्र आढळते आणि कोणत्याही काळात ती टिकते. या अर्थाने वर्ण व्यवस्थेसाठी प्राण देण्यासही माणसाने तयार असावे असे गांधीजींना वाटत असे. मुमुक्षु म्हणजे समाजाचा सेवक. आपली कर्तव्य म्हणजे समाजाने सोपवलेले कार्य ते केल्यास माणसाला मोक्ष मिळू शकतो असे गांधीजींचे मत होते.

ते म्हणत माझ्या मते वर्णाश्रमाच्या प्रश्नाचा धार्मिक दृष्ट्या विचार करताना शंभुकाच्या सारखी उदाहरण देऊ नये. 【संदर्भ एमके गांधी पुस्तक हिंदू धर्म १९७८ पृष्ठ क्रमांक ५६】


१९२७ साली महाड सत्याग्रहा संबंधी लेख आपल्या बहिष्कृत भारत वर्तमानपत्रात लिहिताना गीतेचा आधार घेणाऱ्या आणि श्री कृष्णाचा उल्लेख परमात्मा भगवंत अशा शब्दात करणारे डॉक्टर आंबेडकर यांची श्रीकृष्ण विषयी तसेच गीते विषयाची मते कालांतराने पार बदलली. २४ सप्टेंबर १९४८ रोजी मद्रास येथे केलेल्या भाषणात त्यांनी वेद व गीता हे ग्रंथ खोडसाळ व बाष्कळ असल्याचे आपले मत दिले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली डॉक्टर आंबेडकरांनी हिंदूंचा धर्मग्रंथ त्यांची निंदा-नालस्ती केली म्हणून ठीक ठिकाणी जाहीर सभा घेऊन निषेधाचे ठराव मंजूर करण्यात आले. आंबेडकर वाड्मयाच्या तिसऱ्या खंडात भगवद्गीता विषयी निबंध या मथळ्याखाली डॉक्टर आंबेडकर यांची अप्रकाशित टिपणी छापलेली आहेत. पृष्ठ क्रमांक ३५७ ते ३८०. या टिपणात भगवद्गीता ही बायबल कुराण किंवा धम्मपद याप्रमाणे धर्मग्रंथ नाही तसेच तो तत्वज्ञानावरील प्रबंध ही म्हणता येणार नाही असा डॉक्टर आंबेडकरांनी अभिप्राय दिला आहे. गीतेत श्रीकृष्णाने युद्धाचे आणि त्यातील हत्येचे तात्विक समर्थन केले आहे. आत्मा अमर असतो आणि शरीर हे नष्ट होते असे सांगून युद्ध आणि त्यांच्या हत्या यांच्यामुळे पश्चाताप करण्याची किंवा लाज वाटण्याचे कारण नाही असे कृष्ण सांगतो असे डॉक्टर आंबेडकरांच्या मते गीता प्रतिपादन करते.

खुनाचा आरोप असलेल्या अशिलाच्या वतीने खटल्यात श्रीकृष्ण बचाव पक्षाचे वकील म्हणून समजा आज न्यायालयात उभा राहिला असता आणि त्याने भगवत गीतेत केली आहे तसेच हत्येचे समर्थन केले तर त्याला वेड्याच्या इस्पितळात धाडले जाईल हे निसंशय. डॉक्टर आंबेडकरांचे ही टिपणी ४३ वर्ष अप्रकाशित राहिली तरी १९४४ साली त्यांनी एका सभेत भगवद्गीता यांच्यासंबंधी पुणे येथे जाहीर भाषणात वेदांची निर्मिती ही एक वेड्या व मूर्ख लोकांची कार्य आहे असे उदगार काढले होते, तसेच वर्णाश्रमाच्या स्थर्यासाठीच गीता सांगितली गेली असेही ते म्हणाले होते ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावयास हवी.  【पुस्तक कित्ता पृष्ठ क्रमांक ५४】

श्रीराम आणि शंभू काशी त्याचा शिरच्छेद कसा व का केला ही कथा डॉक्टर आंबेडकरांनी रामाचे कोडे गर्डन्स ऑफ राम उलगडून दाखवताना सांगितला आहे.【खंड ४ पष्ट ३३२】

क्रमशः

Wednesday, 10 October 2018

आंबेडकर व गांधी दोन वेगवेगळ्या विचारधारा ? भाग -०१



भाग -०१

ज्याप्रमाणे कस्तुरबाई गांधी व लक्ष्मी यांच्यामध्ये सापत्नभाव आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी व अस्पृश्यता यांच्यामध्येही थोडासा सापत्नभाव आहे असे म्हणावे लागते. कारण ते जितका खादी प्रसार व हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य यावर भर देतात तितका अस्पृश्यतानिवारण यावर देत नाहीत. तसा जर त्यांनी दिला असता, तर ज्याप्रमाणे काँग्रेसच्या बाबतीत सुता वाचून मत नाही असा त्यांनी हट्ट धरला त्याप्रमाणे अस्पृश्यतानिवारणा वाचून काँग्रेसमध्ये शिरकाव नाही असाही आग्रह त्यांनी धरला असता. असो. जिथे कोणीच जवळ करीत नाही तेथे महात्मा गांधींनी दर्शवलेली सहानुभूती काही कमी नाही. 【संदर्भ मा.फ गांजरे संपादक पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे खंड २ १९७४ पृष्ठ क्रमांक २】

अस्पृश्यता निवारणाचा गांधीजींनी आग्रह धरला तरी तो प्रश्न त्यांना स्वराज्यप्राप्तीचा तसेच हिंदू-मुस्लिम इतक्या इतका निकडीचा वाटत नव्हता, अशी तक्रार एकटे आंबेडकरच करीत होते असे समजण्याचे कारण नाही. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सारखा सवर्ण हिंदू तील करता समाज सुधारक ही गांधीजींना याबद्दल बोललावीत होता, हे लक्षात घ्यावयास हवे. २५ नोव्हेंबर, १९२४ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी गांधीजींना धाडलेल्या पत्रात लिहिले होते. तुमच्या हृदयात प्रथम स्थान खादिला, हिंदू-मुस्लिम ऐक्याला दुसरे आणि अस्पृश्यता निवारणाचा तिसरे स्थान आहे. 【संदर्भ म. प. मंगुडकर आणि इतर संपादक पुस्तक धर्म जीवन व तत्त्वज्ञान महर्षी विठ्ठल रामजी शिंदे १९७९ पृष्ठ क्रमांक ६६३ ते ६६५】

१९०६ सालापासून डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीचे संस्थापक विठ्ठल रामजी शिंदे जातिव्यवस्थेमुळे अस्पृश्य समाजावरील होणारे अन्याय तसेच हिंदू समाजातील विषमता दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागले होते. त्याच वर्षी स्थापन झालेल्या मुस्लिम लीगने अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती हिंदूंपेक्षा वेगळे असून विधानमंडळातील जागांचे वाटप हिंदू व मुसलमान यांच्या लोकसंख्येतील प्रमाणावरून करताना अस्पृश्यांची गणना हिंदूंमध्ये करू नये असे म्हणण्यास सुरुवात केली. या याचा अर्थ व दूरगामी परिणाम लक्षात घेऊन काही सवर्ण हिंदू नेते अस्पृश्योद्धाराचे भाषा करू लागले.

गांधीजींनी अस्पृश्यता निवारण करण्याचे प्रयत्न केले ते सत्याग्रहाच्या मार्गाने नव्हे तर स्पृश्यांचे केव्हा ना केव्हा तरी हृदय परिवर्तन होईल अशी आशा बाळगून त्यासाठी दीर्घकाळ थांबण्यास गांधीजी तयार होते.

आपण हिंदू आहोत एवढे म्हणणे गांधीजींना पुरेसे वाटत नसे तर आपण सनातनी हिंदू आहोत असा ते दावा करीत असत. आपली वेदांवर, उपनिषदांवर पुराणांवर आणि रामायण व महाभारत यांसारख्या हिंदूंच्या धर्मग्रंथांवर श्रद्धा आहे; त्यामुळे अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पना आपल्याला मान्य आहेत, असे गांधीजी जाहीर रीत्या म्हणत असत. गोरक्षणावर माझा विश्वास आहे, मूर्तीपूजेवर माझी श्रद्धा नाही असे नाही, असेही गांधीजी म्हणत असत 【संदर्भ म. गांधी हिंदूधर्म १९७८ पृष्ठ क्रमांक ९】

१९२१ ते १९४७ या काळात महात्मा गांधींच्या वर्ग जातिव्यवस्थेबाबत चे मतांमध्ये हळूहळू बदल होत गेले. आरंभी सहभोजन व आंतरजातीय विवाह करणे हे अस्पृश्यता निवारण्यासाठी आवश्यक नाही असे गांधीजी म्हणत असत. आपल्या आश्रमात दुधा भाई हे अस्पृश्य इतर अश्रमास यांबरोबर बसून भोजन करीत असला तरी आपण असे व बाहेरच्या कुणालाही त्याचे अनुकरण करण्याची शिफारस करणार  नाही. मग आपल्याला कोणी ढोंगी म्हटले तरी चालेल असे असहकार आंदोलनाच्या काळात गांधीजी सांगत असत. 【संदर्भ एमके गांधी हिंदूधर्म १९७८ पृष्ठ क्रमांक १०३ ते १०५】
बॅरिस्टर आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेंनंतर मिस्टर गांधी म्हणाले होते की आंबेडकरांनी हिंदू धर्मग्रंधांचा अभ्यास करावा. अस्पृश्यता  आता उरली नाही असे मत गांधींचे त्यावेळी होते. बॅरिस्टर आंबेडकर १९२४ ते १९३५ पर्यंत गांधी व हिंदू धर्म यावर जहरी टीका करत नसत. एव्हाना काळाराम मंदिर प्रवेशावेळी सत्याग्रहाचा गांधींची तसबीर सभा मंडपात होती.

पण हळू-हळू आंबेडकरांच्या लेखनाची व भाषणाची धार वाढत होती. गांधी व वेद, पुराण, गीता, वर्णाश्रम यावर अनेकदा जाहीर कडवी मुद्देसूद टीका आंबेडकरांनी केली आहे. 【What gandhi and congress done with untouchables? Anhilation of caste. Riddles in Hinduism.】

या उलट कालांतराने बॅरिस्टर गांधींना स्वतःमध्ये बदल करावे लागले. सहभोजन व आंतरजातीय विवाहाबाबत ते सकारात्मक झाले.

यात मला आंबेडकरांचा द्रोष्टेपणा, कालसुसंगतपणा, जाणवतो. आजमितीला आंबेडकर आर्थिक, सामाजिक, राजकीय रित्या किती काल सुसंगत आहेत हे सांगावयास नको. आंबेडकर आज सर्वव्यापी आहेत ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. या पुढेही कालसुसंगत ते टिकेल.

क्रमशः