Saturday, 24 July 2021

आषाढ पौर्णिमा ,वर्षावास



त्रिपिटक


त्रिपिटक (पाली : तिपिटक): हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले. तीन विभाग विनयपिटक (संस्कृत व पाली) सूत्रपिटक (संस्कृत; पाली-सुत्तपिटक) अभिधर्मपिटक (संस्कृत; पाली-अभिधम्मपिटक)


विनयपिटक विनयपिटकाचे एकूण पाच विभाग आहेत. यात बौद्ध संघाच्या व्यवस्थेचे नियम आहेत. (भिक्षुंच्या अनुशासनविषयक नियमांचा संग्रह) १. महावग्ग २. चुलवग्ग ३. पाराजिक ४. पाचित्तिय ५. परिवार.


सुत्तपिटक सुत्तपिटकाचे एकूण पाच विभाग आहेत. यात गौतम बुद्धांचा उपदेश आहे.(सामान्य जनांसाठी प्रवचन) (१) दिघ निकाय (२) मज्झिम निकाय (३) संयुत्त निकाय (४) अंगुत्तर निकाय (५) खुद्दक निकाय.


अभिधम्मपिटक अभिधम्मपिटकाचे सात विभाग आहेत. त्यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे वैज्ञानिक विवेचन केले आहे.(धर्मासंबंधी गंभीर शिकवणूक) १. धम्मसंगणि २. विभंग ३. धातुकथा ४. पुग्गलपञती ५. कथावत्थु ६. यमक ७. पट्ठान.


अडीच हजार वर्षापूर्वी पाली भाषेला मागधी म्हणायचे, जी उत्तर भारतातील लोकभाषा होती. ती भाषा ज्यात बुद्धांनी धर्माची शिकवण दिली होती. ज्या प्रकारे हिंदू धर्मग्रंथाची भाषा संस्कृत आहे आणि कॅथॉलिकांच्या धर्मग्रंथांची भाषा लॅटिन आहे, त्याप्रमाणे पाली भाषेत भगवान गौतम बुद्धांची शिकवण सुरक्षित ठेवली गेली आहे; भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांत ५०० अरहंतांची विशेष सभा (प्रथम संगायन/संगती)झाली होती. त्यात भगवान बुद्धांनी केलेल्या सर्व उपदेशांचे म्हणजे त्यांच्या विपुल मौखिक शिकवणुकीचे संगायन (संकलन) केले गेले आहे. जी शिकवण भगवान बुद्धांनी त्यांच्या ४५ वर्षांच्या जीवनकाळात दिली होती. अरहंत भिक्षुंनी याचे पठन (मुखोदगत) केले त्यापासुन जे लिखित स्वरूपात बनले यालाच त्रिपिटक म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ आहे, ‘तीन पेटारे.’


 हेच त्रिपिटक श्रीलंकेत राजा वट्टगामिनीच्या संरक्षणात झालेल्या चवथ्या संगायनाच्या वेळी ताडपत्रांवर लिहिले गेले.पाचवे संगायन ब्रह्मदेशाच्या मांडले शहरात राजा मिन्डोमिनच्या शासनकाळात झाले. पूर्ण त्रिपिटक संगमरवरी मोठमोठ्या ७२९ पट्ट्यांवर अंकित केले गेले. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक पट्टीला छोट्या पॅगोडात ठेवले गेले. ज्यांना ‘पिटक पॅगोडा’च्या नावाने विश्वातील सर्वांत मोठ्या पुस्तकाच्या रूपाने जाणले जाते. हे पिटक पॅगोडे मांडेल पहाड्याच्या उतारावर बनलेले आहेत़ हे साहित्य नंतर २१ खंडांत छापले गेले.

 #आषाढ पौर्णिमा  #वर्षावास 

Wednesday, 26 May 2021

बुद्धजयंती




युरोपात असा एकही देश नाही की,जिथे बुद्ध धर्माचा प्रचार नाही. भगवान गौतम बुद्ध जगप्रसिद्ध युगपुरुष आहे.

- डॉ बाबासाहेब आंबेडकर

बौद्ध धर्माचा जन्म भारतात झाला. त्याचे प्रवर्तक गौतम बुद्ध ( इ.स.पू. - ५६३ इ.स.पू. ४८३) होते. जगातील जवळपास सर्व महाद्वीपात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. जगातील २० हुन अधिक देश बौद्धराष्ट्र व बौद्ध बहुसंख्य राष्ट्र आहेत. त्यापैकी लाओस, कम्बोडिया, भूटान, थाईलैण्ड, म्यानमार आणि श्रीलंका हे सहा देश "अधिकृत" 'बौद्धराष्ट्र' आहेत. कारण या देशांच्या घटनांमध्ये बौद्ध धर्माला 'राजधर्म' किंवा 'राष्ट्रधर्म' असा दर्जा आहे.असेही अनेक देश जगभरात आहेत जेथे ८०-९०%  जनता ही बौद्ध धर्मीय आहे. यामध्ये चीन, जापान, वियतनाम, थाईलैंड, म्यान्मार, ताइवान, उत्तर कोरिया, कम्बोडिया ,हांगकांग, सिंगापुर , मंगोलिया इत्यादी देशांचा समावेश होतो. 


जगातील सर्वाधिक उंच १० पुतळ्यांपैकी ७ पुतळे हे भगवान गौतम बुद्धांचे आहेत. स्प्रिंग टेंपल बुद्ध हेनान, चीन ५०२ फूट. लेक्युन सेक्या सॅग्ननिंग, म्यानमार ४२३फूट. म्यानमारमधील सर्वाधिक उंच पुतळा ३८१फूट. ग्रेट बुद्ध ॲंग थॉंन, थायलंड ३०२ फूट. ग्रॅंड बुद्ध जिंशू, चीन २८९फूट. लेशान जायंट बुद्ध लेशान, चीन २३३फूट. जगातील सर्वात उंच/मोठा दगडाचा पुतळा.थायलंड ५९.२  १९४फूट.


लेण्यांचे बौद्धधम्मात विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतात खडकांतून कोरलेली सुमारे १,२०० लेणी आहेत. त्यांतील हजाराहून थोडी जास्त लेणी महाराष्ट्रात आढळतात.  त्यांत बौद्ध धर्मीयांच्या लेण्यांची संख्या सर्वाधिक आहे. धार्मिक प्रसार-प्रचार हाच प्रमुख हेतू सामान्यतः बहुतेक लेण्यांतून दिसून येतो. या लेण्यांचा सर्वसाधारण काळ इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. नववे शतक असा मानला जातो. भारतात मौर्यकालात प्रामुख्याने सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत (इ.स.पू. २७३-२३२) बौद्ध लेणी खोदण्यास प्रारंभ झाला असावा, असे त्या लेण्यांतील कोरी लेखांवरून ज्ञात झाले आहे.  भारतात खोदलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध लेण्यांइतकी वैदिक वा हिंदू लेणी प्राचीन नाहीत. अफगाणिस्तानमधील बामियान येथे अनेक शैलगृहे असून, तेथे बुद्धाच्या भव्य मूर्ती आढळतात.


#Budha_Jayati

#२६में२०२१

Tuesday, 25 May 2021




 


बुद्ध जयंती, वैशाख पौर्णिमा, वेसाखमासो

 तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात वैशाख पूर्णिमेस विशेष महत्त्व आहे; कारण तथागताच्या जीवनात अतिशय महत्वपूर्ण पाच अशा ऐतिहासिक घटना या दिनी घडून गेल्या आहेत.


१. पहिली घटना.

जन्म

 कपिलवस्तु नगरीचे महाराज शुद्धोधन व महामाया यांचे राजपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म. महामाया माहेरी जात होत्या. माहेर देवदह हे कपिलवस्तू पासून पूर्वेला १८ किलोमीटर अंतरावर होते. नेपाळ आणि देवदहाच्या मध्ये नेपाळच्या ताराई भागात लुंबिनी नावाचे एक सुंदर उपपवन प्रवासात होते. तेथे अनेक  शालवृक्ष होते. तेथील. फुला-फळांनी बहरलेल्या वनात महामाया थोडा वेळ थांबल्या. एका शालू वृक्षाची झुलणारी फांदी पकडण्यासाठी त्यांनी हात वर केला आणि हलकेसे उंच उचलल्या गेल्या आणि त्यामुळे प्रसवपिडा आरंभ होऊन उभ्याउभ्याच त्यांनी सिद्धार्थ  गौतमाला जन्म दिला. तो दिन होता विशाखा नक्षत्र, मंगळवार वैशाख पौर्णिमा ई. स.पूर्व ५६३.


२ .घटना दुसरी.

यशोधरा यांचा जन्म


 सिद्धार्थ गौतमाच्या धर्मपत्नी  यशोधरा यांचा जन्म कपिलवस्तु नगरीच्या शेजारी रामनगर नावाचे कोलीय राज्याचे राजा दंण्डपाणी यांच्या राजमहालात झाला.


 ३. घटना तिसरी. 

विवाह


 यशोधरेच्या वडिलांनी तिच्या सोळाव्या वर्षी तिचा स्वयंवर सोहळा ठरविला. स्वयंवर सोहळ्यात सिद्धार्थ गौतम यांनी  एका अनियंत्रित घोड्याला आपल्या अश्वलक्ष विद्येने काबू केले आणि त्यावर स्वार झाले. याशिवाय त्यांनी लिखितज्ञान, संख्याज्ञान, बालविद्या, काव्य, व्याकरण, पुराने इतिहास वेद ज्योतिषसांख्य इत्यादी विषयांमधील त्यांचे निपुणता सिद्ध केली.स्वयंवरात सर्व राज्यांच्या, राजपुत्रांच्या आणि प्रियजनांच्या साक्षीने वैशाखी पौर्णिमा ई. स.पूर्व ५४७ या दिनी हा विवाह सोहळा संपन्न झाला.


 ४. घटना चौथी.

ज्ञान प्राप्ती


 राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांस सम्यक संबोधी प्राप्त होऊन चार आर्यसत्य, प्रतीत्य, समुत्पाद इत्यादी सिद्धांताचे ज्ञान प्राप्त झाले. त्यावेळी वय ३५ वर्षांचे होते. तो दिवस होता बुधवार वैशाख पौर्णिमा ई. स.पूर्व ५२८.


५.  घटना पाचवी. महापरिनिर्वाण

भगवान बुद्धांचे वय आता ८० वर्ष झाले होते. भगवान बुद्ध व संघाला चुंद नामक व्यक्ती जो व्यवसायाने लोहार होता. त्याने भोजनदानासाठी घरी आमंत्रित केले. चुंदने सूकरमद्दव नावाच्या कंदमुळ वनस्पतीचे उत्कृष्ट व चविष्ट भोजन तथागत व संघास अर्पण केले. परंतु त्यानंतर तथागतांची प्रकृती बिघडली. शेवटी प्रवासात कुशिनारा येथे मल्लांच्या उपवत्तन शालवनात दोन शालवृक्षांच्या मध्ये आराम करण्यास तथागत थांबले. त्यावेळी भिख्खूंना संस्काराच्या अनित्यतेचा उपदेश केला.

"अनिच्चा व्रत संखारा, उप्पादवय धम्मिनो उपजित्वा निरूज्झान्ति तेसं द्रपुसमो सुखो ".

अर्थात: हे भिक्खुंनो हे सर्व संस्कार नाशवान आहेत तुम्ही अप्रमादी राहून आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करा.

त्यानंतर भगवान बुद्धाने ई. स.पूर्व ४८३ वैशाख पौर्णिमेच्या रात्री अंतिम प्रहरी महापरिनिर्वाणात प्रवेश केला.

Monday, 24 May 2021

बुद्धजयंती



बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होता परंतु तो न्यायाच्याही बाजूचा होता. जिथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. ही गोष्ट वैशाली राज्याचा मुख्य सेनापती असलेल्या सिंह सेनापतीशी झालेल्या त्यांच्या संवादातून उत्तमरित्या दर्शविली गेली आहे. बुद्ध अहिंसेचा उपदेश करत असल्याचे समजल्यावर सिंह सेनापति त्यांच्याकडे गेला व त्यांनी असे विचारले:


 'भगवान अहिंसेचा उपदेश करतात. याचा अर्थ भगवान अपराध्याला शासन करू नये असा उपदेश करतात काय? आमच्या बायका- मुलांचे व आमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आम्ही युद्धावर जाऊ नये, असा उपदेश भगवान करतात काय? अहिंसेच्या नावाखाली आम्ही गुन्हेगारांच्या हातून हानी सोसावी काय? युद्ध सत्याच्या व न्यायाच्या हिताचे असले तरी तथागत सर्व प्रकारच्या युद्धाला प्रतिबंध करतात काय? '


 बुद्धाने उत्तर दिले, " मी जो काही उपदेश करीत आहे त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे व निरपराधी माणसाची सुटका देखील झाली पाहिजे.


न्यायाधीशाने जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही. तेथे शिक्षेचे कारण म्हणजे गुन्हेगाराचा गुन्हा आहे. शिक्षा सुनावणार न्यायाधीश केवळ कायद्याची अंमलबजावणी करीत असतो. त्याला अहिंसा न पाळल्यामुळे दोष लागत नाही. न्यायासाठी व सुरक्षेसाठी लढणाऱ्या माणसावर अहिंसा न पाळल्याचा आरोप करता येऊ शकत नाही. जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय यशस्वी ठरतात तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध सुरु करतो त्याच्यावर येऊन पडते. दुष्ट शक्तींना कोणी कधीच शरण जाता कामा नये. युद्ध असू शकेल, पण ते स्वार्थी हेतूंसाठी असता कामा नये.

Friday, 23 April 2021

आरोग्य





तुमचं वजन कमी करण अथवा जास्त करण तुम्ही किती कॅलरीस खाता यावर आहे. तुम्ही जाड आहेत कारण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज (कर्बोदकांमधे) खाल्यामुळे. 


तुम्हाला पातळ व्हायचं आहे तर एक्सट्राच्या कॅलरीस खाऊ नका किंवा मग त्या जिममध्ये जाऊन खर्च करा.

तुमच्या पोटावर फॅट आहे कारण तुमच्या बॉडीमध्ये फॅटचे प्रमाण अधिक आहे. नुसते पोटावरील फॅट कधीच वाढत नाही. शरीराच्या ठराविक भागाचा फॅट कमी /जास्त करता येत नाही. एक तर संपूर्ण शरीरातील फॅटचे प्रमाण वाढत जाते किंवा ते कमी-कमी होत जाते.


तुम्ही खाल्लेलं फॅट तुमच्या शरीरात सहज साठून राहत. तुम्हीं खाल्लेलं कॅलरीज (कर्बोदक) ग्लुकोज मध्ये रूपांतरित होऊन तुम्हाला ऊर्जा देतात. जर ते कॅलरीज (कर्बोदक) वापरले गेले नाहीत तर ते कॅलरीज (कर्बोदक) ग्लयकोजन मध्ये रूपांतरित होतात. व या ग्लायकोजनचे नंतर फॅट( fatty acid) मध्ये रूपांतर होते .


मुळात कॅलरीज (कर्बोदक) प्रामुख्याने तीन प्रकारात विभागली जातात . तर फॅट्स चार प्रकारात विभागली जातात.