पोस्ट क्रमांक ०२
🟦🟨🟥⬜️🟧
📖 पुस्तक आणि बाबासाहेब
बाबासाहेबांना ५०,००० हून अधिक पुस्तके होती. मुंबईतील राजगृह हे बाबासाहेबानी खास ग्रंथालयासाठी बनविले होते. त्यात इंग्रजी,मराठी,उर्दू,संस्कृत,पारसी,फ्रेंच,जर्मन अशा अनेक भाषांतील ग्रंथांचा समावेश होता. साधारणपणे सोशल सायन्स चे पंधरा भाग,हिस्ट्री ऑफ दि वर्ल्ड चे पंचवीस भाग होते,तसेच इतिहासावर २६००,कायद्यावर आधारित ५०००,राजकारणा संबंधित ३०००,धर्मशास्त्रावर २००० तर १२०० चरित्रे ग्रंथ होती. अर्थशास्त्राची १०००,तत्त्वज्ञानावर ६०००,युद्धशास्त्रावर ३०००,इतर साहित्य ३००० आणि इतर वेगवेगळ्या विषयांवर ७९०० ग्रंथ होते.
राजगृहाच्या या ग्रंथालयामध्ये त्यांच्या गैरहजेरीत कोणालाही जाण्याची मुभा नव्हती,त्यांचा पाळीव कुत्रा पीटर हा राजगृहाच्या दाराशी ग्रंथालयाची राखण करीत असे,हे ग्रंथ वर्गीकरण करून लेबलसह रचून ठेवले होते, त्यामुळे इतक्या प्रचंड ग्रंथालयात त्यांना कोणतेही पुस्तक हवे असल्यास ते अचूक मिळत होते,इंग्लंड मधील ठक्कर कंपनीतुन त्यासाठी बाबासाहेबानी ग्रंथालय कार्ड बनवून घेतले होते,व श.शा.रेगे यांच्याकडे ती जबाबदारी देऊन पुस्तकांची यादी पूर्ण करून घेतली होती.
बाबासाहेबांनी अभ्यास केलेले तत्वज्ञ :
बाबासाहेबांनी हिंदु धर्म ग्रंथ व पुराणे, बौद्ध साहित्य, ख्रिश्चन व मुस्लिम धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता.
त्यांनी हेगल, मार्क्स,एंगेल्स,लेनिन,मुसोलिनी,
वोल्टअर,प्लेटो, सोक्रेटीस,महात्मा फुले,कार्लाईल, जॉन ड्युई, प्रो. सेलिंगमन, बरंट्रँड रसेल, फ़्रेंड्रिंक नितशे, लासकी, मॅक्स म्युलर, एडमंड बर्के, वूल्फ गँग गॉथे, सिगमांड फ्राईड , जॉन स्टुअर्ट मिल,जेरेमी बेंथम, जेम्स मिल, थॉमस पेन, अॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो इत्यादी विचारवंतांचे लेखन व विचार अभ्यासले होते.
त्यांनी बुद्ध, कबीर आणि फुले यांना अभ्यासांती गुरु मानले.
📚 बाबासाहेबांची ग्रंथसंपदा
॰ कास्ट्स इन इंडिया: त्यांची रचना, उत्पत्ती आणि विकास (1917)
॰ स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज (1918)
॰ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: त्याची उत्पत्ती आणि उपाय (1923)
॰ दि इव्हॉल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (1925)
॰ वेटिंग फॉर अ व्हिसा (1935–36)
॰ अनायलेशन ऑफ कास्ट (1936)
॰ मिस्टर गांधी अँड द एमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स (1943)
॰ रानडे, गांधी अँड जिन्ना (1943)
॰ थॉट्स ऑन पाकिस्तान (1941 / 1945)
॰ व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स (1945)
॰ महाराष्ट्र अॅज अ लिंग्विस्टिक स्टेट
॰ हू वेअर द शूद्राज? (1946)
॰ स्टेट्स अँड मायनॉरिटीज (1947)
॰ द अनटचेबल्स: हू वेअर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स (1948)
॰ थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स (1955)
॰ बुद्ध ऑर कार्ल मार्क्स
॰ कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट (1945)
॰ बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन (1950)
॰ द फ्युचर ऑफ पार्लियामेंटरी डेमॉक्रसी
॰ लिंग्विस्टिक स्टेट्स नीड फॉर चेक्स अँड बॅलन्सेस
॰ बुद्धिझम अँड कम्युनिझम (1956)
॰ द बुद्धा अँड हिज धम्मा (1957)
॰ द राईज अँड फॉल ऑफ हिंदू विमेन
बाबासाहेबांच्या जिवन व तत्वद्यानावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.
अनेकांनी आपापल्या वैचारिक बैठकीनुसार आंबेडकरांवर लेखन केले आहे. व्यक्तीगत समज आणि वैचारिक दृष्टिकोनानुसार वेगवेगळ्या लोकांनी लिहलेली वेगवेगळी चरित्र, लेख आणि पुस्तके लिहिली आहेत. वसंत मून ( इंग्रजी, मराठी), सहारे, कुबेर, चांगदेव खैरमोडे, शंकरराव खरात, झेलीयट बाई, ख्रिस्तोफर जेपरलॉट, डी. आर. जाटव, कंवल भारती, उमेश बगाडे, रावसाहेब कसबे, बी. सी. कांबळे, डी. आर कांबळे, आनंद तेलतुंबडे, गेल ऑम्वेट, धनंजय कीर, दत्तोपंत ठेंगडी, रमेश पंतगे, विमलसुर्य चिमनकर, य. दी. फडके, भा. ल. भोळे, शेषराव मोरे, नानकचंद रत्तु, सोहनलाल शास्त्री, आर. संगीता राव, सुधाकर गायकवाड, सुरेश माने अशा सगळ्यांची ( अजूनही अनेक जन आहेत) पुस्तके आहेत आणि सोबतच, बाबासाहेबांचे मूळ साहित्य प्रामुख्याने वाचावेत.
लक्षात घ्या. बाबासाहेब केवळ तत्वज्ञानी नव्हते. त्यांनी कृतियुक्त संघर्षपूर्ण जीवन व्यतीत केल. अर्थशास्त्र, संविधान तज्ञ, लेखक, पत्रकार, इतिहास, मानववंशशास्त्र, धर्मशास्र इत्यादीमध्ये ते पारंगत होते.

0 comments: